✕
  • मुख्यपृष्ठ
  • INDIA AT 2047
  • IPL 2024
  • क्रिकेट
  • निवडणूक
  • अयोध्या राम मंदिर
  • भारत
  • विश्व
  • महापालिका निवडणूक 2022
  • टेलिव्हिजन
  • सिनेमा
  • औरंगाबाद
  • उस्मानाबाद
  • मुंबई
  • पुणे
  • नाशिक
  • नागपूर
  • कोल्हापूर
  • सोलापूर
  • क्रीडा
  • फोटो
  • राशीभविष्य
  • वेब स्टोरी
  • वर वधू
  • धार्मिक
  • शिक्षण
  • ट्रेंडिंग न्यूज
  • आरोग्य
  • लाईफस्टाईल
  • क्राईम
  • राजकारण
  • शेत-शिवार
  • व्यापार-उद्योग
  • पर्सनल फायनान्स
  • म्युच्युअल फंड्स
  • आयपीओ
  • जॅाब माझा
  • ऑटो
  • टेक-गॅजेट
  • ब्लॉग
  • उपयुक्तता
  • संपर्क करा
  • IDEAS OF INDIA

Zero Hour Full : छगन भुजबळांवर अन्याय? ते सायबर घोटाळे ; झीरो अवरमध्ये सविस्तर चर्चा

विजय साळवी, एबीपी माझा   |  23 Dec 2024 11:51 PM (IST)

नमस्कार, मी सरिता कौशिक.. झीरो अवरच्या विशेष भागात आपलं स्वागत... जहाँ नहीं चैना, वहा नहीं रहना... असं म्हणत अजित पवारांना उघड उघड नाराजी व्यक्त करणारे...  जिथं सन्मान मिळेल तिथं जावू असं म्हणत पक्षांतराचे संकेत देणारे...  कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांवर कौतुकाचा वर्षाव करणारे.. ओबीसींचे ज्येष्ठ नेते आणि येवला विधानसभा मतदारसंघाचे आमदार छगन भुजबळ....
भारतीय जनता पक्षात जाणार नाहीत..
हे मी नाही.. तर खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी स्पष्ट केलंय..
त्याचं झालंय असं.. की १५ डिसेंबरला झालेल्या मंत्रिमंडळ विस्तारात भुजबळांना मंत्रिपद मिळालं नाही.. आणि सुरु झालं.. नाराजीनाट्य..


आज भुजबळांच्या नाराजी नाट्यालाही आठ दिवस पूर्ण होतायेत.. गेल्या अठ्ठेचाळिस तासांमधल्या भुजबळांच्या संबंधित घटनांचा रिकॅप समजून घेणं महत्वाचं ठरतं..


महाराष्ट्रातील ओबीसी समाज आपल्यासोबत आहे... हे दाखवण्यासाठी आधी छगन भुजबळांनी आपल्या कार्यकर्त्यांशी संवाद साधला... काल राज्यातल्या ओबीसी संघटनांच्या प्रमुखांशी चर्चा केली.. त्यात राष्ट्रीय ओबीसी बहुजन पक्षाचे संस्थापक प्रकाश शेंडगे, ओबीसी नेेते मंगेश ससाणे यांच्यासह अनेक नेते होते.. त्यांनी भुजबळांना समर्थन दिलं..
शिवाय, बबनराव तायवाडे यांच्या राष्ट्रीय ओबीसी महासंघानंही भुजबळांचं समर्थनच केलंय.. म्हणजे काय तर राज्यातल्या काही प्रमुख संघटना छगन भुजबळांच्या पाठीशी उभ्या आहेत.. हे दिसून आलंय..


सातत्याने भुजबळ भाजपात जाणार का हा सवाल उपस्थित होत असतानाच ... आज सकाळी छगन भुजबळ थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या भेटीला पोहोचले.. आणि चर्चा अजूनच रंगल्या. छगन भुजबळ राष्ट्रवादी काँग्रेसला रामराम करणार... आणि भाजपात जाणार..  पण भेटीत काय झालं.. हे खुद्द भुजबळांनीच स्पष्ट केलंय.. ते आधी ऐकूयात..


```````````````````````


ब्रेकनंतर तुमचं स्वागत, तुम्ही पाहताय झीरो अवर. आजच्या दुसऱ्या सत्रात आपण तुमची आणि तुमच्या पैशाच्या हिताची चर्चा करणार आहोत. मंडळी अलीकडे फोनवरून किंवा ई-मेलवरून गंडा घालण्याचे प्रकार प्रचंड वाढलेत. तुमचं नाव एका गंभीर गुन्ह्यात आलं आहे, त्याची शहानिशा करेपर्यंत आम्ही तुम्हाला अटक करतोय असा सांगणारा फोन तुम्हाला येतो ... पण ही अटक डिजिटल अरेस्ट आहे, आम्ही तुम्हाला डिजिटली अरेस्ट करतोय असं तुम्हाला सांगितलं जातं. आता डिजिटल अरेस्ट म्हणजे काय ...तर फोनवरून तुम्हाला सांगितलं जातं की तुम्ही आहात तिथेच राहा, बाहेर जाऊ नका, कुणाला फोन करून हे प्रकरण कळवू नका आणि आमची तुमच्यावर पूर्णवेळ पाळत असेल. अनेक वेळेला तुम्हाला पूर्ण वेळ फोन चार्ज करून तुम्ही आहात तिथे व्हिडियो कॉल २४ तास सुरू ठेवायला ही सांगितलं जाऊ शकतं. 


मुळात, डिजिटल अरेस्ट असा काही प्रकारच कायद्यात नाही. मात्र तुमचं किंवा तुमच्या मुला-मुलीचं नाव गंभीर गुन्ह्यात आरोपी म्हणून आलंय असं सांगितल्यावर अनेक लोक घाबरून जातात, आणि बिथरलेल्या मनस्थितीत स्कॅमर्स सांगतील तसं करत जातात.


या घोटाळ्यांची व्याप्ती एवढी व्यापलीये की केवळ मुंबई शहरात सायबर फसवणूकीची रक्कम हजारकोटींपेक्षा जास्त आहे, तर महाराष्ट्रात नोव्हेंबर महिन्यात १ हजार १८१ कोटीं रुपये सायबर गुन्ह्यांमध्ये लुटल्या गेल्याची नोंद झाली आहे. बरं, यामध्ये केवळ अशिक्षित लोक फसतात असं नाही. निवृत्त बँक कर्मचारी, लष्करी
अधिकारी, सीए, डॉक्टर, इंजीनिअर असे उच्चशिक्षित लोक देखील मोठ्या संख्येनं या घोटाळ्यांचे शिकार बनत आहेत.


या घोटाळेबाजांच्या बोलण्यात येऊन काही लोक पैसे ट्रान्सफर करतात, आणि मग त्यांच्या लक्षात येतं की आपली फसवणूक झालीये. त्यामुळे फोन किंवा ई-मेलवरून कुणीही पैसे मागितले, तरी पैसे पाठवू नका. कुठलीही बँक, अन्य आर्थिक संस्था किंवा तपास यंत्रणा फोनवरून पैसे मागत नाही, कायद्यात तशी तरतूदच नाही हे नेहमी ध्यानात ठेवा.


या घोटाळ्यांची संख्या इतकी वाढलीये की खुद्द पंतप्रधान मोदींनी आपल्या मन की बात कार्यक्रमात याबाबत सविस्तर माहिती दिली आणि नागरिकांना सावध केला. नेमकं काय म्हणाले पंतप्रधान मोदी, पाहूयात.

  • मुख्यपृष्ठ
  • टीवी शोज
  • झीरो अवर
  • Zero Hour Full : छगन भुजबळांवर अन्याय? ते सायबर घोटाळे ; झीरो अवरमध्ये सविस्तर चर्चा

TRENDING VIDEOS

Uddhav Thackeray On Amit Shah : गोमांस खाणाऱ्यांसोबत जेवण, ठाकरेंचा अमित शाहांवर वार6 Hour ago

Uddhav Thackeray PC FULL : गोमांस खाणाऱ्यांसोबत जेवण, ठाकरेंचा Amit Shah यांच्यावर वार7 Hour ago

Mahapalikecha Mahasangram Bhiwandi : पाणी, रस्ते,आरोग्य... मूलभूत सुविधांची वानवा ; भिवंडीकर आक्रमक7 Hour ago

Mahapalikecha Mahasangram Amravati : भावी नगरसेवकांकडून अमरावतीकरांच्या अपेक्षा काय?7 Hour ago

About us | Advertisement| Privacy policy
© Copyright@2025.ABP Network Private Limited. All rights reserved.