Zero Hour Full BMC Election : मुंबईत पुन्हा मराठी-अमराठी वाद? मतांच्या ध्रुवीकरणाला खतपाणी?
नए किरदार आते जा रहे हैं
मगर नाटक पुराना चल रहा है
राहत इंदौरी यांचा या हा शेर... सध्याच्या राजकारणाला अगदी चपखल बसणारा आहे. बघा ना, नवे नेते येतात, नवे पक्ष येतात, नव्या युत्या आघाड्या घडतात - बिघडतात .. असे किती तरी नये किरदार, निवडणुका आल्या की दिसायला लागतात, पण ज्या मुद्दयांवर राजकीय नाटक रंगतं ते मुद्देही जुनेच आणि ते वादही जुनेच...
मुंबईतला एक अगदी जुना वाद... तुमच्या आमच्या ओळखीचा आणि काही जणांसाठी अगदी जिव्हाळ्याचाही. मराठी विरुद्ध अमराठी... मुंबई कोणाची? या प्रश्नाला राजकीय हवा अधून मधून दिली जातेच... त्यात निवडणुका आल्या की हा वाद काही नेत्यांच्या प्रचाराचा मेखेचा मुद्दा असतोच. आतापर्यंत तर तुम्हीच ओळखलं असेल, मी कुणाबद्दल बोलतेय ते. निवडणुकीच्या तोंडावर मराठी - अमराठी वादाला ताजी फोडणी दिलीय मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी. ही झणझणीत फोडणी काही जणांना रूचली आहे तर काही जणांच्या नाकाला झोंबलीय... आणि यावरच आपण चर्चाही करणार आहोत...
शिवाय नगर पंचायती आणि नगर परिषदांच्या निवडणुकांच्या प्रचारातही रंगत आलीये... युत्या-आघाड्यांच्या झेंड्यांच्या घड्या मोडल्या गेल्यात...आणि अनेक ठिकाणी क्रॉस कनेक्शन्स लागली आहेत.. या सगळ्याचंच विश्लेषण आज आपल्याला करायचंय...
नमस्कार मी पूर्वी भावे... झीरो अवरला सुरुवात करण्याआधी ऐकूयात राज ठाकरे नेमकं काय म्हणालेत...