✕
  • मुख्यपृष्ठ
  • INDIA AT 2047
  • IPL 2024
  • क्रिकेट
  • निवडणूक
  • अयोध्या राम मंदिर
  • भारत
  • विश्व
  • महापालिका निवडणूक 2022
  • टेलिव्हिजन
  • सिनेमा
  • औरंगाबाद
  • उस्मानाबाद
  • मुंबई
  • पुणे
  • नाशिक
  • नागपूर
  • कोल्हापूर
  • सोलापूर
  • क्रीडा
  • फोटो
  • राशीभविष्य
  • वेब स्टोरी
  • वर वधू
  • धार्मिक
  • शिक्षण
  • ट्रेंडिंग न्यूज
  • आरोग्य
  • लाईफस्टाईल
  • क्राईम
  • राजकारण
  • शेत-शिवार
  • व्यापार-उद्योग
  • पर्सनल फायनान्स
  • म्युच्युअल फंड्स
  • आयपीओ
  • जॅाब माझा
  • ऑटो
  • टेक-गॅजेट
  • ब्लॉग
  • उपयुक्तता
  • संपर्क करा
  • IDEAS OF INDIA

Zero Hour Full : सरपंच हत्याकांड ते मंत्र्यांकडून अधिकाऱ्यांची झाडाझडती; सविस्तर चर्चा

विजय साळवी, एबीपी माझा   |  24 Dec 2024 11:11 PM (IST)

नमस्कार मी विजय साळवी... झीरो अवर या एबीपी माझाच्या विशेष कार्यक्रमात आपलं स्वागत.. 


मंडळी, एखादं शहर... एखादं गाव.. एखादं राज्य... किंवा अगदी एखादा देशही... यांची तिथल्या वैशिष्ट्यांनुसार एक विशिष्ट ओळख असते.. 


मंडळी.. पाकिस्तान किंवा चीन म्हटलं ना की ते दोन्ही देश आपल्या कुरापतींसाठी प्रसिद्ध आहेत.. तसंच अमेरिका आणि रशिया त्यांच्या सामरिक शक्तीसाठी तर इंग्लंड त्यांच्या साम्राज्यासाठी... मंडळी, यात कधीकधी एखादी ओळख मिरवण्यासारखी असते... पण एखादी ओळख लाजिरवाणीही असू शकते...


अशीच काही बिरुदं आपल्या देशातही आहेत.. ती सांगताना एखाद्या राज्याचा अपमान करण्याचा आमचा कोणताही हेतू नाहीय.. पण, वाढत्या गुन्हेगारीचं उदाहरण देताना आपले राजकारणी एखाद्या शहराची किंवा राज्याची तुलना उत्तरेतील राज्यांची नावं घेऊन करतात..


नेत्यांच्या भाषणांपासून अगदी चित्रपटांपर्यंत काही राज्यं ही फक्त गुन्हेगारीसाठीच प्रसिद्ध आहेत.. असंच सांगण्यात आलंय.. दाखवण्यात आलंय..


आता तुम्ही म्हणाल की हे मी का सांगतोय.. तर मंडळी.. त्यांचं कारण आहे.. 
ते म्हणजे सोळा दिवसांपूर्वी बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावाच्या सरपंचाची म्हणजे संतोष देशमुखांची झालेली निर्घृण हत्या..


आणि आज सोळा दिवसांनंतरही या घटनेवरून सुरु झालेलं राजकारण थांबलेलं नाही...


घटना एका गावाची... एका जिल्ह्याची जरी असली.. तरी त्यावरुन अवघ्या राज्याचं राजकारण पेटलंय..


बरं, फक्त राजकीय आरोप प्रत्यारोप असते.. तर मी शहरांच्या वेगवेगळ्या बिरुदांचा इतिहास तुम्हाला सांगितला नसता.. पण, बीडच्या हत्याकांडावरून सुरु झालेल्या राजकीय आरोप-प्रत्यारोपात आपल्या शहरांची तुलना गुन्हेगारीसाठी प्रसिद्ध असलेल्या राज्यांशी केली जात आहे. आणि हा नक्कीच एक चिंतेचा मुद्दा आहे.. आधी पाहूयात विरोधकांनी नेमकं काय म्हटलंय?


 


तुम्ही पाहाताय एबीपी माझा आणि एबीपी माझावर सुरुय झीरो अवर. 


मंडळी, महायुतीच्या नव्या सरकारच्या मंत्र्यांनी पदभार स्वीकारून आता जवळपास दोन दिवस झालेत. नवे मंत्री म्हटलं की नव्यानं मिळणारा बंगला येतो. आणि त्या बंगल्यांच्याच वाटपावरून मुंबईच्या राजकीय वर्तुळात चर्चा रंगल्या आहेत. 


मुंबईत मंत्र्यांसाठी एकूण ४२ बंगले आहेत. हे ४२ बंगले तीन परिसरांमध्ये वसलेले आहेत. पहिला अर्थातच मलबार हिल, दुसरा पेडर रोड आणि तिसरा नरीमन पॉईंट म्हणजे मंत्रालयाच्या समोर.
 
मलबार हिल आणि पेडर रोडवरील बंगले अधिक प्रशस्त आहेत. वर्षा, देवगिरी, नंदनवन, रॉयलस्टोन, रामटेक, ज्ञानेश्वरी, शिवगिरी, पर्णकुटी ही त्याची काही उदाहरणं. तर मंत्रालयासमोरचे बंगले तुलनेनं लहान आहेत. 


मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना अर्थातच वर्षा बंगला मिळाला आहे, तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे नंदनवन बंगल्यातच राहणार आहेत. गेल्या सरकारमध्ये अजित पवारांकडे देवगिरी बंगला होता, यापुढेही त्यांनी देवगिरी बंगल्यात राहणं पसंत केलंय. 


आज चर्चेमध्ये असणारा बंगला म्हणजे रामटेक. हा बंगला खरं तर महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळेंना देण्यात आला होता. पण पंकजा मुंडेंनी या बंगल्यात राहण्याची आपली इच्छा बावनकुळेंकडे व्यक्त केल्याचं कळतं. बावनकुळेंनीही त्याला लगेच होकार दिला अशी चर्चा आहे. पंकजा यांचं या रामटेक बंगल्याशी भावनिक नातं आहे. कारण त्यांचे वडील गोपीनाथ मुंडे मंत्री असताना रामटेक बंगल्यावर राहायचे. 


रामटेक हा सर्व सरकारी बंगल्यांमधला सर्वात सुंदर बंगला मानला जातो. या बंगल्याच्या लॉनवरून थेट समुद्र पाहण्याचा आनंद घेता येतो. रामटेकपासून हाकेच्या अंतरावर फडणवीसांचा सागर बंगला आहे. अर्थात, फडणवीस आता काही दिवसच सागरवर असतील, मुख्यमंत्री या नात्यानं त्यांना आता वर्षावर शिफ्ट व्हावं लागेल. 


दरम्यान, सरकारी बंगल्यांवरून यंदा जाहीर रस्सीखेच झाली नसली तरी त्याची चर्चा कायमच होत असते. त्यावरच आहे आजचा आमचा दुसरा प्रश्न. त्यावरील प्रतिक्रिया आपण काही वेळानं पाहणारच आहोत, पण त्याआधी प्रश्न पाहूयात, आणि त्यासाठी जाऊयात पोल सेंटरला. 

  • मुख्यपृष्ठ
  • टीवी शोज
  • झीरो अवर
  • Zero Hour Full : सरपंच हत्याकांड ते मंत्र्यांकडून अधिकाऱ्यांची झाडाझडती; सविस्तर चर्चा

TRENDING VIDEOS

Sanjay Kelkar on Thane Mahayuti : ठाण्यातील महायुतीवर नाराजी असली तरी युती धर्म पाळणार9 Minutes ago

Chandrakant Khaire vs Ambadas Danve : भाजपला सोपं जावं म्हणून दानवेंनी... खैरेंचे स्फोटक आरोप14 Minutes ago

Anandraj Ambedkar BMC Election : भविष्यात आम्हीही बंधू एकत्र येऊ;आनंदराज आंबेडकरांचं मोठं वक्तव्य18 Minutes ago

Chhatrapati Sambhajinagar BJP : संभाजीनगरात भाजपमध्ये नाराजीचा उद्रेक, अतुल सावेंसमोर नाराज संतप्त9 Hour ago

About us | Advertisement| Privacy policy
© Copyright@2025.ABP Network Private Limited. All rights reserved.