Zero Hour DJ : डॉल्बीचा नाद, जीवाचा घात? झीरो अवरमध्ये सविस्तर चर्चा
abp majha web team Updated at: 27 Sep 2023 10:06 PM (IST)
पर्यावरण संरक्षण कायदा एकोणिसशे शहाऐंशी, ध्वनिप्रदूषण नियम २०००नुसार आणि न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार ध्वनीची मर्यादा दिवसा ५० ते ६५ आणि रात्री ४० ते ५५ डेसिबलपर्यंतच असणे गरजेचे आहे. त्यावर गेल्यास ते ध्वनिप्रदूषण ठरते.. मनुष्य ऐंशी डेसिबलपर्यंतचा आवाज सहन करतो. त्यापुढील आवाज सातत्याने ऐकला तर त्याचा आरोग्यावर दुष्परिणाम होतो. नव्वद डेसिबलचा आवाज सतत ऐकला तर कानाला इजा होते. दीडशे डेसिबलचा आवाज ऐकला तर कानाचा पडदा तात्काळ फाटू शकतो. आणि जर तुम्ही एकशे पंच्याऐंशी डेसिबलच्या पातळीवरचा आवाज ऐकल्यास, शरीरांतर्गत अवयवांवर परिणाम होऊन मृत्यूही ओढावण्याचा संभव आहे... इतकंच नाही तर मिरवणुकांमध्ये वापरले जाणारे लेझर लाईट्सही तितकेच धोकादायक आहेत.. कारण, गेल्या वर्षी अनेकांना याच लेझर लाईट्समुळे दृष्टी गमवावी लागली होती..