Zero Hour : Dhule Corporation : महापालिकेचे महामुद्दे : कचरा जाळल्यामुळे नागरिकांना श्वसनाचे आजार
abp majha web team | 05 Feb 2025 11:23 PM (IST)
Zero Hour : Dhule Corporation : महापालिकेचे महामुद्दे : कचरा जाळल्यामुळे नागरिकांना श्वसनाचे आजार
पश्चिम महाराष्ट्रातल्या कोल्हापुरातून जाऊयात उत्तर महाराष्ट्रातल्या धुळे शहरात... मंडळी, भारतात असं कुठलं शहर असेल, जिथं समस्याच नाहीत? आपल्या शहरांमध्ये तर समस्यांचा डोंगरच असतो. आता धुळे शहराचंच उदाहरण घ्या. गेल्या काही दिवसांमध्ये आम्ही धुळ्याचे तीन स्पेशल रिपोर्टस दाखवले. पहिला रिपोर्ट होता पाणीटंचाईवर, मग अमृत योजनेसाठी नव्यानं तयार करण्यात आलेले रस्ते पुन्हा कसे खणण्यात आले हे आपण पाहिलं. त्यानंतर धुळे शहराला फेरीवाल्यांचा कसा विळखा पडलाय, यावरही आम्ही प्रकाशझोत टाकला. पण त्याच धुळ्यातील समस्यांची यादी काही संपता संपत नाहीय. धुळ्यात एका विशिष्ट कारणामुळं आता नागरिकांच्या श्वसनाचे आजार वाढू लागलेयत. पाहूयात स्पेशल रिपोर्ट.