✕
  • मुख्यपृष्ठ
  • INDIA AT 2047
  • IPL 2024
  • क्रिकेट
  • निवडणूक
  • अयोध्या राम मंदिर
  • भारत
  • विश्व
  • महापालिका निवडणूक 2022
  • टेलिव्हिजन
  • सिनेमा
  • औरंगाबाद
  • उस्मानाबाद
  • मुंबई
  • पुणे
  • नाशिक
  • नागपूर
  • कोल्हापूर
  • सोलापूर
  • क्रीडा
  • फोटो
  • राशीभविष्य
  • वेब स्टोरी
  • वर वधू
  • धार्मिक
  • शिक्षण
  • ट्रेंडिंग न्यूज
  • आरोग्य
  • लाईफस्टाईल
  • क्राईम
  • राजकारण
  • शेत-शिवार
  • व्यापार-उद्योग
  • पर्सनल फायनान्स
  • म्युच्युअल फंड्स
  • आयपीओ
  • जॅाब माझा
  • ऑटो
  • टेक-गॅजेट
  • ब्लॉग
  • उपयुक्तता
  • संपर्क करा
  • IDEAS OF INDIA

Zero Hour Fadnavis Office: गृहमंत्र्यांच्या ऑफिसबाहेर तोडफोड; Keshav Upadhye Atul Londhe EXCLUSIVE

विजय साळवी, एबीपी माझा   |  27 Sep 2024 10:46 PM (IST)

नमस्कार मी विजय साळवी... झीरो अवरमध्ये आपलं स्वागत...
मंडळी कुणी जर विचारलं की महाराष्ट्रात सर्वात महत्वाची इमारत कोणती...? तर कोणीही सांगेल की मंत्रालय... 
कारण, इथूनच आपल्या राज्याच्या... महाराष्ट्राच्या कामकाजाचा गाडा हाकला जातो.. त्यातही सर्वात महत्वाचा मजला कोणता... तर उत्तर सहावा मजला... जिथं मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांची केबिन्स आहे.. 
आता तुम्ही म्हणाल की मंत्रालयाचा हा भूगोल... आम्ही आता का सांगतोय.. तर उत्तर आहे...
एक महिला..
त्यांचं नाव धनश्री सहस्रबुद्धे..
याच धनश्री काल संध्याकाळी पावणेसातच्या सुमारास मंत्रालयात पोहोचल्या..
आता इथं आणखी एक प्रश्न पडतो तो म्हणजे धनश्री सहस्रबुद्धे पावणेसातच्या सुमारास मंत्रालयात गेल्या कशा?
कारण सर्वसामान्यांना मंत्रालयात जाण्यासाठीचा मिळणारा पास हा फक्त संध्याकाळी साडेपाच वाजेपर्यंतचाच मिळतो..
तुमच्यापैकी कधी कोणी मंत्रालयात आलं असेल किंवा बातम्या पाहिल्या असतील... तर 
तुम्हालाही याची कल्पना असावी.
आता पुढची गोष्ट ऐका..
जेव्हा याच धनश्री सहस्रबुद्धे मंत्रालयात पोहोचल्या.. त्याही पास न काढता.. 
इतकंच नाही तर त्या मंत्रालयात शिरल्या.. आणि त्यांनी थेट सहावा मजला गाठला... तिथून त्या पोहोचल्या उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या दालनासमोर... तिथं त्यांनी आरड़ाओरडा करायला सुरुवात केली.. त्याचबरोबर  देवेंद्र फडणवीसांच्या कार्यालयाबाहेर लावलेली नेमप्लेट तोडली.. दालनातील कुंड्यांचीही नासधूस केली... 
इतका सगळा प्रकार घडला.. महिलेच्या घरी पोलीसही पोहोचले.. चौकशी सुरु केली... आणि पुढे आलं मुळ कारण... धनश्री सहस्रबुद्धेंची मानसिक स्थिती ठीक नसल्याची माहिती समोर आली... त्यानंतर त्यांचं समुपदेशनही करण्यात येतंय... धनश्री सहस्रबुद्धे यांनी याआधीही भाजप कार्यालयात गोंधळ घातला होता.. तसंच राहत्या सोसायटीमध्येही त्यांनी अनेकांशी भांडणं केल्याच्या तक्रारी आहेत.. इतकंच नाही तर मॅजिस्ट्रेट कोर्टानं धनश्री सहस्रबुद्धे यांना  मनोरुग्णालयात दाखल करण्याचे आदेशही दिले होते..  तरीही या धनश्री विनापास मंत्रालयात शिरल्या कशा..? याचाच तपास पोलीस करतील..  पण, घटनेनं जो प्रश्न उपस्थित केलाय.. तोच प्रश्न आम्हीही आज महाराष्ट्राला विचारलाय... तोच पाहण्यासाठी जाऊयात पोल सेंटरला..

  • मुख्यपृष्ठ
  • टीवी शोज
  • झीरो अवर
  • Zero Hour Fadnavis Office: गृहमंत्र्यांच्या ऑफिसबाहेर तोडफोड; Keshav Upadhye Atul Londhe EXCLUSIVE

TRENDING VIDEOS

Krishna Khopde BJP : Tukaram Mundhe विरोधात लक्षवेधी मांडल्यामुळे कृष्णा खोपडेंना धमकीचा फोन3 Hour ago

Nagpur Leopard Rescue Operation | बिबट्याला डार्ट बसला,अर्ध बेशुद्ध अवस्थेत 15 फूट उंचीवर उडी मारली3 Hour ago

Zero Hour Full EP :निवडणूक जिंकण्यासाठी पैशांचा वारेमाप वापर होतोय, विरोधकांचा आरोप पटतो? सखोल चर्चा14 Hour ago

Akola Police : घर सोडून गेलेल्या मुलाला अकोला पोलिसांनी कसं शोधलं Special Report15 Hour ago

About us | Advertisement| Privacy policy
© Copyright@2025.ABP Network Private Limited. All rights reserved.