Zero Hour D Gukesh World Chess Champion : युवा ग्रँडमास्टर डी. गुकेश बुद्धिबळाच्या पटावरचा 'राजा'
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppZero Hour D Gukesh World Chess Champion : युवा ग्रँडमास्टर डी. गुकेश बुद्धिबळाच्या पटावरचा 'राजा'
तुम्ही पाहताय एबीपी माझा आणि एबीपी माझावर सुरुय झीरो अवर.
मंडळी, भारताचा युवा ग्रँडमास्टर डी. गुकेशनं जागतिक बुद्धिबळाच्या विजेतेपदावर आपलं नाव कोरून नवा इतिहास घडवलाय. विश्वनाथन आनंद यांच्यानंतर बुद्धिबळाचा विश्वविजेता होण्याचा मान मिळवणारा गुकेश हा भारताचा दुसरा बुद्धिबळपटू ठरला. सिंगापूरमध्ये पार पडलेल्या चौदा डावांच्या फायनलमध्ये गुकेशनं गतविजेता चीनचा ग्रँडमास्टर डिंग लिरेनला अखेरच्या डावात हरवलं आणि विश्वविजेतेपदावर आपलं नाव कोरलं. त्या दोघांमधल्या फायनलमध्ये तेराव्या डावाअखेर ६.५-६.५ अशी बरोबरी होती. त्यामुळं चौदाव्या आणि अखेरच्या डावात दोन्ही बुद्धिबळपटूंवर प्रचंड ताण होता. अवघ्या १८ वर्षांच्या गुकेशनं लिरेनचा १४ डावानंतर ७.५-६.५ अशा गुणांनी पराभव केला.