✕
  • मुख्यपृष्ठ
  • INDIA AT 2047
  • IPL 2024
  • क्रिकेट
  • निवडणूक
  • अयोध्या राम मंदिर
  • भारत
  • विश्व
  • महापालिका निवडणूक 2022
  • टेलिव्हिजन
  • सिनेमा
  • औरंगाबाद
  • उस्मानाबाद
  • मुंबई
  • पुणे
  • नाशिक
  • नागपूर
  • कोल्हापूर
  • सोलापूर
  • क्रीडा
  • फोटो
  • राशीभविष्य
  • वेब स्टोरी
  • वर वधू
  • धार्मिक
  • शिक्षण
  • ट्रेंडिंग न्यूज
  • आरोग्य
  • लाईफस्टाईल
  • क्राईम
  • राजकारण
  • शेत-शिवार
  • व्यापार-उद्योग
  • पर्सनल फायनान्स
  • म्युच्युअल फंड्स
  • आयपीओ
  • जॅाब माझा
  • ऑटो
  • टेक-गॅजेट
  • ब्लॉग
  • उपयुक्तता
  • संपर्क करा
  • IDEAS OF INDIA

Zero Hour Chhagan Bhujbal OBC : छगन भुजबळांवर अन्याय? ओबीसी संघटनांची मागणी काय?

विजय साळवी, एबीपी माझा   |  23 Dec 2024 11:49 PM (IST)

ब्रेकनंतर तुमचं स्वागत, तुम्ही पाहताय झीरो अवर. आजच्या दुसऱ्या सत्रात आपण तुमची आणि तुमच्या पैशाच्या हिताची चर्चा करणार आहोत. मंडळी अलीकडे फोनवरून किंवा ई-मेलवरून गंडा घालण्याचे प्रकार प्रचंड वाढलेत. तुमचं नाव एका गंभीर गुन्ह्यात आलं आहे, त्याची शहानिशा करेपर्यंत आम्ही तुम्हाला अटक करतोय असा सांगणारा फोन तुम्हाला येतो ... पण ही अटक डिजिटल अरेस्ट आहे, आम्ही तुम्हाला डिजिटली अरेस्ट करतोय असं तुम्हाला सांगितलं जातं. आता डिजिटल अरेस्ट म्हणजे काय ...तर फोनवरून तुम्हाला सांगितलं जातं की तुम्ही आहात तिथेच राहा, बाहेर जाऊ नका, कुणाला फोन करून हे प्रकरण कळवू नका आणि आमची तुमच्यावर पूर्णवेळ पाळत असेल. अनेक वेळेला तुम्हाला पूर्ण वेळ फोन चार्ज करून तुम्ही आहात तिथे व्हिडियो कॉल २४ तास सुरू ठेवायला ही सांगितलं जाऊ शकतं. 


मुळात, डिजिटल अरेस्ट असा काही प्रकारच कायद्यात नाही. मात्र तुमचं किंवा तुमच्या मुला-मुलीचं नाव गंभीर गुन्ह्यात आरोपी म्हणून आलंय असं सांगितल्यावर अनेक लोक घाबरून जातात, आणि बिथरलेल्या मनस्थितीत स्कॅमर्स सांगतील तसं करत जातात.


या घोटाळ्यांची व्याप्ती एवढी व्यापलीये की केवळ मुंबई शहरात सायबर फसवणूकीची रक्कम हजारकोटींपेक्षा जास्त आहे, तर महाराष्ट्रात नोव्हेंबर महिन्यात १ हजार १८१ कोटीं रुपये सायबर गुन्ह्यांमध्ये लुटल्या गेल्याची नोंद झाली आहे. बरं, यामध्ये केवळ अशिक्षित लोक फसतात असं नाही. निवृत्त बँक कर्मचारी, लष्करी
अधिकारी, सीए, डॉक्टर, इंजीनिअर असे उच्चशिक्षित लोक देखील मोठ्या संख्येनं या घोटाळ्यांचे शिकार बनत आहेत.


या घोटाळेबाजांच्या बोलण्यात येऊन काही लोक पैसे ट्रान्सफर करतात, आणि मग त्यांच्या लक्षात येतं की आपली फसवणूक झालीये. त्यामुळे फोन किंवा ई-मेलवरून कुणीही पैसे मागितले, तरी पैसे पाठवू नका. कुठलीही बँक, अन्य आर्थिक संस्था किंवा तपास यंत्रणा फोनवरून पैसे मागत नाही, कायद्यात तशी तरतूदच नाही हे नेहमी ध्यानात ठेवा.


या घोटाळ्यांची संख्या इतकी वाढलीये की खुद्द पंतप्रधान मोदींनी आपल्या मन की बात कार्यक्रमात याबाबत सविस्तर माहिती दिली आणि नागरिकांना सावध केला. नेमकं काय म्हणाले पंतप्रधान मोदी, पाहूयात.

  • मुख्यपृष्ठ
  • टीवी शोज
  • झीरो अवर
  • Zero Hour Chhagan Bhujbal OBC : छगन भुजबळांवर अन्याय? ओबीसी संघटनांची मागणी काय?

TRENDING VIDEOS

Silver Rate Hike : चांदीचे दर वाढण्याची नेमकी कारणं काय? चांदी दर तीन लाख पार.. Special Report41 Minutes ago

Snehal Shivkar :'पतीच्या समाजसेवेच्या कामामुळे यश', रिक्षाचालकाची पत्नी ठाकरेंच्या सेनेची नगरसेविका41 Minutes ago

Thane Mahapalika Mayor : बहुमत जोरदार पण कोण 'ठाणे'दार? भाजप-सेनेत वाद पेटणार? Special Report49 Minutes ago

Mohit Kamboj Coffee With Kaushik : तेजस ठाकरेंचे 'ते' व्हिडीओ, मलिकांशी वैर ते सिद्दिकी प्रकरण57 Minutes ago

About us | Advertisement| Privacy policy
© Copyright@2026.ABP Network Private Limited. All rights reserved.