Zero Hour : Chandrapur Corporation : महापालिकेचे महामुद्दे : शहरातील कारंजांना कचराकुंडीचं स्वरुप

Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appआधी सौंदर्यीकरण करायचं, पण नंतर डागडुजीअभावी तीच गोष्ट साऱ्या परिसराला कशी विद्रूप करते, याचं ताजं उदाहरण पाहायचं असेल तर चंद्रपूर शहरात जावं लागेल. तिथं महापालिकेनं जनतेच्या पैशातून १५ कारंजांचं बांधकाम केलं. पण ते बांधकाम पूर्ण झाल्यापासून त्यांची दुरुस्ती किंवा डागडुजी काहीच झालेलं नाही. त्यामुळे हे कारंजे आता डासांचा आगार बनले आहेत. पाहूयात हा स्पेशल रिपोर्ट.
चंद्रपूर.. विदर्भातील एक महत्त्वाचं शहर. या शहरात दोनच वर्षांपूर्वी महापालिकेनं एक स्तुत्य उपक्रम राबवायचं ठरवलं.
शहर सुशोभीकरणासाठी पालिकेनं १२ छोटे आणि तीन मोठे दगडी कारंजे अर्थात वॉटर फाऊंटन उभारले. मात्र देखरेखीअभावी या कारंजांना कचराकुंडीचं स्वरुप आलंय.
या प्रकल्पासाठी तब्बल दोन कोटींचा खर्च आला. ज्या कंत्राटदारानं बांधकाम केलं, त्यानंच तीन वर्षं याची डागडुजी करणं बंधनकारक होतं. मात्र तसं झालेलं नसल्यानं पालिका आता त्याच्यावर कारवाई करणार आहे.
मुंबई असो वा पुणे, नागपूर असो किंवा चंद्रपूर.. आपल्या महापालिकांना आपलं काम सुधारण्यास प्रचंड वाव आहे. तसंच, त्यांना जाब विचारण्याचे मार्ग देखील सरकारनं करून देणं गरजेचं आहे. तरंच आपली शहरं स्वच्छ, सुंदर राहतील. सारंग पांडे, एबीपी माझा, चंद्रपूर.