Zero Hour : Bhiwandi Corporation : महापालिकेचे महामुद्दे : भिवंडीतील कामवारी नदी मृत्यूशय्येवर

Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appतुम्ही पाहताय एबीपी माझा... आणि एबीपी माझावर सुरुय झीरो अवर... झीरो अवरच्या दुसऱ्या सत्रात आपण पाहणार आहोत विविध शहरांमधल्या महापालिकेच्या महामुद्देमधील विशेष रिपोर्टस. त्यासाठी पहिल्यांदा जाऊयात भिवंडीत. मंडळी आपल्या संस्कृतीत नदीला आईचा दर्जा दिला जातो. गोदामाई, कृष्णामाई, गंगामैय्या या आपल्यासाठी केवळ नद्या नाहीत तर जीवनाचा स्रोत आहेत. या नद्यांभोवतीच खरं तर आपली संस्कृती बहरली. एकीकडे हे चित्र असलं तरी या आईसमान नदीचे तिच्या मुलांकडून प्रचंड हाल सुरू आहेत. आता भिवंडीचंच उदाहरण घ्या. एकेकाळी अख्ख्या भिवंडी तालुक्याला पोसणारी कामवारी नदी सध्या अखेरच्या घटका मोजतेय. सांडपाणी, कंपन्यांमधलं रसायनयुक्त पाणी, कचरा.. सगळं काही या नदीत सोडलं जातं. आणि याकडे कुणाचंही लक्ष नाहीय. किंबहुना जाणूनबुजून लक्ष दिलं जात नाही असा नागरिकांचा आरोप आहे. पाहूयात महापालिकेच्या महामुद्देमधला स्पेशल रिपोर्ट.