Zero Hour : बारमतीत नणंद-भावजय लढत? ते मराठा आरक्षण, झीरो अवरमध्ये सविस्तर चर्चा
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appलोकसभा निवडणुकांचे पडघम वाजू लागलेत.. राजकीय पक्षांच्या रणनीतींना जोर चढलाय...प्रत्येक पक्षात आज काय काय घडामोडी झाल्या त्या तर बघणार आहोतच पण आज सर्वात मोठी राजकीय बातमी आली ती बारामतीतून ...
नणंद-भावजय सामन्याची ... हो.. नाही म्हणता म्हणता अखेरीस सुनेत्रा पवार.. उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या पत्नी.. शरद पवारांच्या सूनबाई.. निवडणूक लढवण्यास सज्ज झाल्याचे चित्र आहे .. तेही बारामतीमधून ... शरद पवारांची लेक.. अजित पवारांची बहिण सुप्रिया सुळेंविरोधात...
आज असं काय घडलं कि ह्या बातमीने जोर पकडला ...
तर त्याच झालं असं की आज सकाळपासून, सुनेत्रा पवार यांच्या कामाची माहिती देणारा थेट विकास रथच बारामतीच्या रस्त्यांवर फिरू लागला.. शिवाय कालच सुनेत्रा पवारांनी जिल्ह्यातले एकमेव भाजप आमदार राहूल कूल आणि त्यांच्या पत्नी कांचन कूल.यांच्या घरी जाऊन भेट घेतली. महत्वाचे हे कि आमदार राहुल कुल यांच्या पत्नी कांचन कुल या गेल्या लोकसभा निवडणुकीत सुप्रिया सुळेंविरोधात उभ्या होत्या.. एकीकडे सुप्रिया सुळेंनी बारामती सोडणार नाही असे घोषित केलेच असताना, आज खुद्द दादाही बारामतीत तळ ठोकून होते..सुनेत्रा पवारांच्या कामाचा विकास रथच फक्त बारामतीत फिरला नाही, तर दादांनी दमदार भाषणात उमेदवार कोण हे नाव जरी घेतले नाही तरी सांकेतिक मात्र काहीच सोडले नाही... बारामतीत राष्ट्रवादीच्या लोक सभेचा अधिकृत उमेदवार सुुनेत्रा पवारच असणार यावर त्यामुळे आज शिक्कामोर्तबच झालंय.. आता फक्त अधिकृत घोषणा बाकी आहे.. त्यामुळे जे आजपर्यंत कधीच पाहायला मिळालं नाही.. ते पवार विरुद्ध पवार चित्र, यंदाच्या लोकसभा निवडणुकीत या महाराष्ट्राला पाहायला मिळण्याची दाट शक्यताय.. दरम्यान या सर्व घडामोडींवर शरद पवार गटासोबत असलेले नातू, रोहित पवारांनीही सूचक वक्तव्य करताना.. भाजपवर टीका केलीय.. पाहूयात..