Zero Hour : शंकराचार्यांच्या आशीर्वादानंतर राजकारण जोरात;महंत नारायणगिरींचा टोला
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppZero Hour : शंकराचार्यांच्या आशीर्वादानंतर राजकारण जोरात;महंत नारायणगिरींचा टोला आता वेळ झालीय शंकराचार्यांच्या वक्तव्यावरून सुरू झालेल्या राजकारणावर, आम्ही विचारलेल्या प्रश्नाची... त्या प्रश्नावर तुम्ही काय प्रतिक्रिया दिल्या आहेत.. त्या प्रतिक्रिया पाहण्यासाठी जावूया आपल्या मीडिया सेंटरवर... सनातन धर्मात शंकराचार्यांचे पद हे सर्वोत्तम मानले जाते.. हिंदू समाजाचे धर्माबाबत प्रबोधन व्हावे, त्यांना धर्माबाबत उपदेश करण्यात यावा म्हणून.. आदि शंकराचार्यांनी भारतात चार मठ स्थापन केले.. आणि त्या प्रत्येक मठाचे एक असे चार शंकराचार्य आहेत.. त्यापैकीच एक आहेत, ज्योतिर्मठाचे शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वती महाराज.. पण सध्या शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद प्रबोधनाऐवजी आपल्या राजकीय वक्तव्यांमुळेच अधिक चर्चेत आलेत.. कालच त्यांनी उद्धव ठाकरेंची मुंबईत भेट घेतल्यानंतर, उद्धव ठाकरेंसोबत विश्वासघात झाल्याचं वक्तव्य केलं होतं.. आणि त्यांच्या याच वक्तव्यावरून सध्या राजकीय वातावरण चांगलंच तापलेलं आहे.. शंकराचार्यांनी राजकारणात शिरू नये अशी प्रतिक्रिया अनेक नेत्यांनी दिलीय... तर त्यांच्या विश्वासघाताच्या विधानावर श्री पंचनाम जुन्या अखाड्याचे प्रवक्ते, महंत नारायण गिरींनी जोरदार आक्षेप घेतलाय.. शंकराचार्य साधारण व्यक्तींकडे कधी जात नाही मात्र, उद्योगपती - मोठ्या विवाहात जातात.. उद्धव ठाकरेंनी हिंदुत्वाला धोका दिला, नाहीतर देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री बनणार होते.. उद्धव ठाकरे हे विद्रोहींसोबत मिळालेत.. त्यामुळे त्यांना आशीर्वाद देणं चुकीचं असल्याचा टोला महंत नारायणगिरी यांनी लगावलाय... तर काही वर्ष काँग्रेसमध्ये असणारे... मात्र आता भाजपमध्ये सामील झालेले आचार्य प्रमोद यांनीही शंकराचार्यांना सल्ला दिलाय.. तो आधीपाहूयात..