Zero Hour Amol Mitkari : हर्षवर्धन पाटलांचं आव्हान, महायुती दत्ता भरणेंना निवडणून आणणार?

Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appआणि आता वेळ झालीय.. आपल्या आजच्या पहिल्या प्रश्नावर चर्चा करण्याची.. त्याचे राजकीय पडसाद आणि परिणामांचं विश्लेषण करण्याची.. आणि त्यासाठी आपण जावूयात गेस्ट सेंटरला.. जिथं आपल्यासोबत आहेत अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी...
१) अमोलजी, खरं तर महाराष्ट्राच्या राजकारणातल्या विविध घडामोडींवर आपल्याशी आज चर्चा करायची आहे. पण पहिला प्रश्न आज अकोल्यात दोन गटांमध्ये एका क्षुल्लक कारणानं झालेल्या तणावाविषयी. काय नेमकं घडलं? काय बातमी आहे तुमच्याकडे?
२) हर्षवर्धन पाटलांचा शरद पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश झाला. इंदापुरातून त्यांच्या उमेदवारीवरही जयंत पाटील आणि शरद पवारांकडून शिक्कामोर्तब झालं. त्यानंतर महाराष्ट्राच्या राजकारणात शरद पवारच बिग बॉस असल्याचं हर्षवर्धन यांनी म्हटलंय. तुम्हाला पटतंय?
३) बारामती लोकसभा मतदारसंघात सुनेत्रा पवारांच्या पराभवात हर्षवर्धन पाटलांचा अदृश्य होता हे त्यांनी स्वत: मान्य केलंय. त्या निवडणुकीत सुप्रियाताईंना इंदापुरात जवळपास २५ हजारांची आघाडी मिळाली होती. आता विधानसभा निवडणुकीतही बारामती लोकसभेतल्या निकालाची पुनरावृत्ती करण्याचा हर्षवर्धन पाटलांचा निर्धार आहे?
४) इंदापुरात हर्षवर्धन पाटील विरुद्ध दत्ता भरणे ही लढाई पुन्हा होण्याची चिन्हं आहेत. पण यावेळी दत्ता भरणेंना निवडून आणण्यासाठी तुमची काय तयारी आहे? कारण हर्षवर्धन पाटलांच्या पंखात यावेळी शरद पवार आणि महाविकास आघाडीचं बळ असणार आहे.
५) दादांसोबत आलेला एकही शिलेदार परत जाणार नाही, असं तुमच्याकडून सांगण्यात येत होतं. पण आता तर १४ ऑक्टोबरला फलटणमध्ये रामराजे निंबाळकरांचाही पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश होत असल्याचं सांगण्यात येतंय. दस्तुरखुद्द शरद पवारांनीही आज व्यासपीठावर आपण १४ ऑक्टोबरला फलटणमध्ये जात असल्याचा उल्लेख केला. तुमची किंवा तुमच्या पक्षाची यावर काय प्रतिक्रिया आहे?
६) मूळच्या राष्ट्रवादी काँग्रेसमधल्या पहिल्या फळीच्या नेत्यांबाबत सध्या साशंकतेचं वातावरण आहे. दिलीप वळसे पाटलांबद्दलही आता चर्चा. तुम्हाला काय वाटतं?
७) अजित पवारांनी बारामतीतून विधानसभा निवडणूक न लढवण्याचे संकेत दिले आहेत. पण तुम्ही तर म्हणताय की दादा बारामतीतूनच विधानसभा लढणार. शंभर टक्के खात्री आहे?
८) महायुतीच्या लोकसभा उमेदवार नवनीत राणा यांनी श्रीकांत शिंदे यांच्यासमोर अडसूळ पितापुत्रांनी आपलं काम केलेलं नसल्याचा आरोप केला. भाजप आणि शिंदेंच्या शिवसेनेमधला हा संघर्ष महायुतीला त्रासदायक ठरणार का?