Zero Hour : अमेरिकेत पुन्हा अग्नितांडव, कॅरिलोनच्या दक्षिण-उत्तरेत पेटलाय वणवा
Zero Hour : अमेरिकेत पुन्हा अग्नितांडव, कॅरिलोनच्या दक्षिण-उत्तरेत पेटलाय वणवा
अमेरिकेच्या कॅलिफोर्नियामध्ये गेल्या महिन्यात भीषण वणवे आणि अग्नितांवडानंतर आता पुन्हा एकदा देशात वणव्याचा कहर पाहायला मिळतोय.. उत्तर आणि दक्षिण कॅरोलिना राज्यात रविवारी वणवा पेटला.. आज चार दिवसानंंतरही देशात आगीवर नियंत्रण आलेलं नाहीय.. कोरड्या हवामान आणि जोरदार वाऱ्यांमुळे वणवा वेगानं पसरला.. प्रशासनाने तातडीने बचाव कार्य सुरू केलंय.. अनेक भागांतील रहिवाशांंचंही स्थलांतर झालंय. असं असलं तरी अमेरिकेच्या राष्ट्रीय हवामान खात्यानं आग आणखी वाढण्याचाच इशारा दिलाय. कारण, वाढत्या उष्णतमुळे वातावरणातील आर्द्रता कमी होतीय.. आणि त्यासोबत वेगवाग वाऱ्यामुळे आग झपाट्याने पसरत आहे. प्रशासनाकडून आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी प्रयत्न सुरू असून नागरिकांना सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.