Zero Hour Manikrao Kokate Dhananjay Munde : दोन मंत्री वादाच्या भोवऱ्यात, अजित पवार राजीनामा घेणार?

Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appनमस्कार मी अमोल जोशी... झीरो अवरमध्ये आपलं स्वागत.. मंडळी गेल्या दोन महिन्यात असा एकही आठवडा गेला नसेल.. ज्यात मंत्री धनंजय मुंडेंवर आरोप झाला नसेल.. संतोष देशमुख हत्याप्रकरण ते कथित कृषी घोटाळा..
सुरुवात झाली संतोष देशमुख प्रकरणातील आरोपी वाल्मिक कराडांशी संबंध असल्याचा आरोप करत.... मंत्रिपदाच्या राजीनाम्याची मागणी सुरु झाली.. त्यानंतर सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानियांनी मोर्चा पुढे नेला... आणि धनंजय मुंडे कृषी मंत्री असतानाच्या काही व्यवहारांनावरुन आरोप सुरु केले.. अगदी आज सकाळीही अंजली दमानियांनी एक मोठा आरोप केला....
२३ सप्टेंबर २०२४ आणि ३० सप्टेंबर २०२४.... या दोन तारखांवर कृषी विभागानं घेतलेल्या निर्णयावरुन दमानियांनी आरोप केलाय.. याच दोन्ही तारखांवर घेतलेल्या निर्णयांमुळे दोनशे कोटी रुपयांचा घोटाळा झाल्याचा दावा दमानियांनी केलाय..
धनंजय मुंडेंनी कृषी सचिवांना लिहीलेलं पत्रही अंजली दमानियांनी सोशल मीडिया पोस्ट केलं.. २३ सप्टेंबर २०२४ ला झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत कृषी विभागाचा एकही विषय नसल्याचंही उघड झालंय. ३० सप्टेंबरच्या बैठकीत ३ विषय कृषी विभागाशी संबंधित होते. मात्र त्यात बळकटीकरण योजनेशी संबंधित एकही विषय नव्हता असं दिसून आलंय...
हे झालं एक प्रकरण..
आता आजचं दुसरं मोठं प्रकरण.. ज्यात अजित पवारांचेच आणखी एक मंत्री अडणीत आलेत.. आणि ते आहेत.. कृषिमंत्री माणिकराव कोकाटे.. प्रकरण इतकं गंभीर आहे की त्यात माणिकराव कोकाटेंवर आमदारकी जाण्याची टांगती तलवार आहे. कारण, नाशिक जिल्हा आणि सत्र न्यायालयानं त्यांना दोन वर्षांची शिक्षा आणि पन्नास हजारांचा दंड ठोठावलाय... १९९५ मध्ये मुख्यमंत्री कोट्यातून घर मिळवण्यासाठी कोकाटेंनी गरीब असल्याचं दाखवत खोटी कागदपत्रं सादर केली. आणि दोन घरं पदरात पाडून घेतली. सोबतच इतर दोघांना मिळालेली घरंही कोकाटेंनी लाटली. माजी मंत्री तुकाराम दिघोळेंच्या याचिकेवर कोर्टानं तब्बल २८ वर्षांनंर निकाल दिला. यात कोकाटेंसोबत त्यांचे भाऊ सुनील कोकाटेही दोषी ठरलेत. दरम्यान कोकाटेंना लगेच जामीनही मिळालाय... पण, असं असलं तरी त्यांची आमदारी राहणार की जाणार.. त्यांच्या मंत्रिपदाचं काय होणार? हेही आपण आजच्या भागात समजून घेणार आहोत..
पण, सुरुवातीला आजचा प्रश्न.. तोच पाहण्यासाठी जावूयात पोल सेंटरला....