Zero Hour ABP Majha : Sharad Pawar गटाला मोठा धक्का बसणार? झीरो अवरमध्ये सविस्तर चर्चा
abp majha web team | 24 Aug 2023 11:35 PM (IST)
२ जुलै २०२३ ला अजित पवारांनी आपली वेगळी वाट धरली.. काही सहकाऱ्यांसोबत मंत्रिपदाची शपथ घेतली.. आणि शिंदे-फडणवीसांच्या सरकारमध्ये सहभागी झाले.. खरतर, त्यांनंतर शरद पवार विरुद्ध अजित पवार असा संघर्ष होईल असं वाटलं होतं.. मात्र, तसं होताना दिसत नव्हतं.. कारण, दोन्ही नेत्यांनी एखादं उदाहरण सोडलं तर गेल्या दोन महिन्यात एकदाही एकमेकांवर जोरदार टीका केली नाही.. उलट दोन्ही नेत्यांमध्ये संवाद सुरुच होता.. त्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम होता.. शिवाय मविआमध्येही कुजबूज सुरु झाली होती..