Zero Hour ABP Majha :मोदींचा महाराष्ट्र दौरा ते लोकसभा निवडणूकीचा प्रचार;झीरो अवरमध्ये सविस्तर चर्चा
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppZero Hour ABP Majha :मोदींचा महाराष्ट्र दौरा ते लोकसभा निवडणूकीचा प्रचार;झीरो अवरमध्ये सविस्तर चर्चा गोदाकाठावरचं जलपूजन झाल्यानंतर मोदी काळाराम मंदिरात पोहोचले.. तिथं त्यांनी विधिवत पूजन केलं. त्यानंतर राममंदिराला पंतप्रधान मोदींनी प्रदक्षिणा मारली.प्रदिक्षणेनंतर मंदिरातच आयोजित केलेल्या भजन किर्तनात पंतप्रधान सहभागी झाले. त्यावेळींनी टाळही वाजवले.. आता काळाराम मंदिरच का? तर त्याचे कारण काय असू शकते हे सांगते. काळाराम मंदिराला धार्मिक आणि सामाजिक महत्व आहे.. याच मंंदिरामध्ये प्रवेशासाठी १९३० साली एक मोठा संघर्ष सुरु झाला होता. डॉ. आंबेडकरांनी अस्पृश्यता निवारणासाठी जितके लढे दिलेत.. त्या लढ्यांमध्ये काळाराम मंदिराच्या सत्याग्रहाचं स्थान मोठं आहे.. नाशिकातल्या काळाराम मंदिरात अस्पृश्यांसह अनेक जमातींच्या लोकांना प्रवेश बंदी होती.. त्यामुळे आंबेडकरांनी हजारो अस्पृश्यांसह प्रवेश करण्याचा निर्धार केला. २ मार्च एकोनिशे तीस साली सुरु झालेला लढा.. जवळपास महिनाभर शेकडो रामभक्त काळाराम मंदिराबाहेर बसून होते.. अखेर ९ एप्रिलला रामननवीच्या दिवशी सत्याग्रही आणि त्यांना विरोध करणाऱ्या हिंदू संघटनांमध्ये तडजोड झाली.. आणि सर्वसामाजाच्या तरुणांनी रामाचा रथ ओढावा असं ठरलं...मात्र, आंबेडकरांच्या अनुयायांना ती संधी मिळालीच नाही.. उलट त्यांच्यावर दगडफेक झाली.. हाच लढा पाच वर्ष चालला.. मात्र, तरीही इथं अस्पृश्य समाजाला प्रवेश मिळालाच नाही.. पुढे स्वातंत्र्यानंतर मंदिरं खुली झाली.. आणि प्रत्येकाला इथं प्रवेश मिळू लागला.. पुढे साल २००५ ला समरसता मंचाने इथूनच समरसता यात्रेचा प्रारंभ केला. मोहन भागवत तेव्हा संघाचे सरकार्यवाह होते. त्यांच्यासह ज्येष्ठ साहित्यिक आनंद यादव आणि काळाराम मंदिराचे महंत सुधीर दास हि उपस्थित होते. या प्रसंगी बोलताना महंत सुधीर दासांनी सांगितले होते कि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना मंदिरात प्रवेश नाकारून माझ्या आजोबांनी पाप केले, ज्याचे मी आता प्रायश्चित घेत आहे. सब के है श्री राम ---- हे बिंबवण्याचा प्रयत्न सध्या संघ परिवार करत असताना भाजपसाठी सुद्धा एकवटलेला हिंदू समाज हा महत्वाचा आहे हे वेगळे सांगायची गरज नाही. याच इतिहासामुळे मोदींच्या आजच्या इथल्या पूजेचं महत्वं आणखी वाढतं.. पूजा-अर्चा झाल्यानंतर मोदींनी आज काळाराम मंदिरात स्वच्छताही केली. २२ जानेवारीला होणाऱ्या राममंदिर सोहळ्याआधी देशातल्या सर्व मंदिरात स्वच्छता मोहिम राबवण्याचं आवाहन पंतप्रधानांनी याआधीच केलं होतं. त्यानुसार काळाराम मंदिरात पंतप्रधानांनी पूजन झाल्यावर हाती झाडू घेत स्वच्छता केली. आणि देशवासियांना एक आवाहन केलं..