Zero Hour ABP Majha : राष्ट्रवादीतील वाद ते संसदेत घुसखोरी; झीरो अवरमध्ये सविस्तर चर्चा
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppZero Hour ABP Majha : राष्ट्रवादीतील वाद ते संसदेत घुसखोरी; झीरो अवरमध्ये सविस्तर चर्चा घड्याळाचे काटे ज्याप्रमाणे सतत फिरत असतात.. त्याचप्रमाणे वादातून जन्माला आलेल्या राष्ट्रवादीतही सातत्याने वाद सुरूच असतात.. नॉनस्टॉप.. सध्या महाराष्ट्राचं राजकारणही या राष्ट्रवादी भोवतीच फिरतंय.. नॉनस्टॉप... सत्तेत येणं असो किंवा पक्ष कोण चालवणार? यावरून शरद पवार गट आणि अजित पवार गटात राडा सुरूय.. सध्या हा वाद निवडणूक आयोगापुढेही गेलाय.. आणि या सर्व राजकीय वादाच्या केंद्रस्थानी आहे ते 'पत्र'.. मग ते फडणवीसांना पाठिंब्याचं असो... शरद पवारांच्या राजीनाम्याचं असो... आमदारांचं अजित पवारांना समर्थनाचं पत्र असो... की अजून काही... आणि या पत्रांच्या वादात आता आणखी एका पत्राची भर पडलीय.. चोरीच्या पत्राची...