Zero Hour ABP Majha : मनोज जरांगेंचा मोर्चा ते राजन साळवींवर ACB ची रेड; झीरो अवरमध्ये सविस्तर चर्चा
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appमराठा समाजासाठी प्रशासनाने आणखी एक महत्त्वाचं पाऊल उचललं आहे.. मराठा समाज तसेच खुल्या प्रवर्गातील म्हणजेच ओपन कॅटेगॉरीतीळ नागरिकांचे सर्वेक्षण करण्यात येणार आहे.. हे काम महसूल विभाग करणार आहे. २३ जानेवारीपासून, घरोघरी जाऊन हा सर्व्हे केल्या जाणार आहे. राज्य मागासवर्ग आयोगाच्या वतीने राज्यभर मराठा समाजाचे मागासलेपण तपासण्याचे काम सुरू राहिल.. , ३१ जानेवारीपर्यंत हि मोहीम सुरु असणार आहे. या सर्वेक्षणासाठी सॉफ्टवेअर सुद्धा तयार करण्यात आले आहे... या सर्वेक्षणाचं प्रशिक्षणही कर्मचारी-पदाधिकाऱ्यांना देण्यात येतंय..
एकिकडे सरकार मराठा आरक्षणासाठी जोरदार हालचाली करत असताना.. ओबीसींनी सरकारला धारेवर धरलंय... राज्यात सरकारी भरतीत वाढणारं कंत्राटीकरण, तसंच शिक्षणात मागासवर्गियांना न मिळणारं आरक्षण यावरून, ओबीसी नेते आणि माजी खासदार हरीभाऊ राठोडांनी भुजबळांना टार्गेट केलंय.. पाहूयात...