Zero Hour ABP Majha : रोहित पवारांची ED चौकशी ते मनोज जरांगेंचा मोर्चा; झीरो अवरमध्ये सविस्तर चर्चा
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppZero Hour ABP Majha : रोहित पवारांची ED चौकशी ते मनोज जरांगेंचा मोर्चा; झीरो अवरमध्ये सविस्तर चर्चा एक काळ असा होता की भ्रष्टाचाराचा साधा आरोप झाला तरी सामान्य लोकं हताश निराश व्हायचे.. त्याला मोठा कलंक मानायचे.. भ्रष्टाचार करणाराकडे बघण्याचा समाजाचा दृष्टीकोन सुद्धा बदलून जायचा. समाजात वावरणं कठीण जायचं. काहीजण तर अक्षरश: जीवनातून उठायचे.. नंतर मोठमोठ्या पदावरील लोकांनी आणि राजकारण्यांनी भ्रष्टाचाराला शिष्टाचाराचं रुप दिलं आणि चित्र बदललं. आकडा लाखो कोटीच्या खाली असेल तर त्याचं काही वाटेनासं झालं.. कोट्यवधीची कॅश एखाद्याच्या घरात सापडली तरी कोणाला काही वाटेनासं झालं. भ्रष्टाचाराकडे "चलता है" एटिट्यूडने बघायची सवय लागली. राजकारणाची पातळी अशी घसरली प्रत्येक कारवाई राजकीय हेतूने, सूड बुद्धीने प्रेरित आहे असं सांगायची प्रथा सुरु झाली. नेत्यावर भ्रष्टाचाराचे आरोप झाले तरी त्याला लढवय्या म्हंटलं जाऊ लागलं, गंभीर गुन्ह्यात तुरुंगात गेला तरी त्याला हुतात्मा ठरवलं जाऊ लागलं. तुरुंगातून सुटल्यावर त्याचे चिल्लेपिल्ले-बगलबच्चे त्याची मिरवणूक काढून इव्हेंट साजरा करु लागले. त्याला भावनिक स्वरुप देऊ लागले. सहानुभूती कशी मिळेल यासाठी प्रयत्न करु लागले. आणि या दलदलीमध्ये कुणीही मागे नाही. दुसऱ्याकडे असला की भ्रष्टाचारी, तोच आपल्याकडे आला की संस्कारी असे प्रकारही सुरु झाले, काहींनी त्याला वॉशिंग मशीन कल्चर असं नावंही दिलं. या सगळ्या गोष्टींचा वेग आणि आवाका बघता हे चित्र नजीकच्या भविष्यात बदलेल याची शक्यता कमी आहे, असं दुर्दैवाने म्हणावं लागतंय