Zero Hour ABP Majha : चांद्रयान 3 मोहिम फत्ते, भारत अंतरिक्ष महासत्ता ठरेल? झीरो अवर सविस्तर चर्चा
abp majha web team | 23 Aug 2023 11:27 PM (IST)
Zero Hour ABP Majha : चांद्रयान 3 मोहिम फत्ते, भारत अंतरिक्ष महासत्ता ठरेल? झीरो अवर सविस्तर चर्चा. इतिहास घडला, चंद्र कवेत आला... १४० कोटी भारतीय ऊर आज अभिमानानं भरुन आलंय .. अवघ्या जगासमोर भारतानं एक नवा इतिहास घडवलाय... त्याचा मुहूर्त होता निज श्रावण शुक्ल सप्तमीचा... अर्थात २३ ऑगस्ट २०२३ आणि वेळ संध्याकाळी सहा वाजून ४ मिनिटांची ... ज्यावेळी भारताच्या भाळी ऐतिहासिक यशाचा टिळा लागला..... भारताच्या अभिमानाची, स्वाभिमानाची आणि अत्यंत गौरवाची ... चांद्रयान-३ मोहीम फत्ते झालीय..