Zero Hour Thackeray Pawar : आदित्य ठाकरेंनी दिल्ली दौऱ्यातून काय मिळवलं? पवारांची भेट का टाळली?

Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appनमस्कार मी विजय साळवी... तुम्ही पाहताय एबीपी माझा... एबीपी माझाचा विशेष कार्यक्रम झीरो अवरमध्ये आपलं स्वागत...
मंडळी.. सध्या लग्नसराईचा हंगाम सुरु आहे... गेल्या महिन्याभरात तुम्हीही किमान एका तरी लग्नसोहळ्याला हजेरी लावली असेलच... आता मला सांगा... की.. लग्न कोणाचंही असो.. सोहळा लहान असो की मोठा... चर्चा कशाची रंगते... किंवा लग्नाच्या वर्षभरानंतरही कोणत्या गोष्टीची जास्त चर्चा वऱ्हाडी मंडळी करतात... तर ती असते.. त्या लग्नसोहळ्यातल्या जेवणाची...
आता तुम्ही म्हणाल... की लग्नाच्या पंगतींच्या गोष्टी का सांगतोय.. तर त्याचं काय आहे मंडळी...
सध्या ठाकरे आणि शिंदे यांच्या दोन शिवसेना पक्षांमध्ये जो राजकीय संघर्ष सुरु आहे... त्या संघर्षाच्या केंद्रस्थानी आल्यायत... राजकीय पंगती... शिवसेनेचे मुख्य नेता आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ऑपरेशन टायगर लॉन्च करून ठाकरेंची शिवसेना खालसा करायला सुरुवात केलीय.. राजापूरचे माजी आमदार राजन साळवींच्या रुपानं या मोहिमेला मोठं यशही लाभलं...
पण शिंदेंनी फक्त नेत्यांवरच न थांबता ठाकरेंच्या खासदारांनाही आपल्याकडे आणण्याची तयारी सुरु केलीय... त्यासाठीच दिल्लीत शिंदेंच्या खासदारांच्या घरी डिनर डिप्लोमसी सुुरु झाली.. तिथं ठाकरेंच्या तीन तीन खासदारांनी उपस्थिती राखली.. कोण आहेत ते खासदार आणि नेमकं कोणत्या मंत्र्यांच्या घरी त्यांनी काल रात्रीचं जेवण घेतलं... हे सगळं आपण पाहणार आहोत.. पण, जे जे खासदार शिंदेंच्या मंत्र्यांच्या घरी जाऊन जेवले... त्यांनाच नाही तर ठाकरेंच्या शिवसेनेच्या सगळ्या खासदारांना आदित्य ठाकरेंनी दिल्लीत जाऊन मोठा सल्ला दिला...
बरं, जिथं फक्त एकनाथ शिंदेंचा सत्कार केला म्हणून ठाकरेंचे मुख्य प्रवक्ते आणि खासदार संजय राऊतांनी शरद पवारांवर घणाघाती टीका केली.. तर त्यांचेच खासदार जर शिंदेंच्या मंत्र्यांच्या घरी जेवणासाठी जात असतील.. तर त्यावर ठाकरेंनी काय सूचना दिल्या असतील.. याचा अंदाज लावण्याची गरज नाही..
आता तुम्हाला असं वाटेल, की आदित्य ठाकरे फक्त आपल्या खासदारांनाच सल्ला द्यायला दिल्लीत आले की काय? तर तसं नाहीय... मंडळी, आदित्य ठाकरे हे दोन दिवसांच्या दिल्ली दौऱ्यावर होते...
खरं तर, शरद पवारांच्या हस्ते शिंदेंचा दिल्लीत सत्कार झाल्यापासून ठाकरेंची शिवसेना किती नाराज झालीय.. हे आपण कालपासून पाहतोय.. त्याच पार्श्वभूमीवर आदित्य ठाकरेंनी दिल्ली दौऱ्यावर जाणं... आणि या दौऱ्याची सुरुवात काँग्रेसचे माजी अध्यक्ष आणि लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्या भेटीनं करणं... ही सगळ्यांसाठीच धक्का देणारी बाब होती.. दोघांमध्ये जवळपास पाऊण तास चर्चाही झाली.. ही भेट इतकी गुप्त होती.. की तब्बल १२ तासानंतर माध्यमासमोर येऊन दस्तुरखुद्द आदित्य ठाकरेंनीही त्या भेटीची माहिती दिली..
सगळ्यात महत्वाचं म्हणजे दिल्ली दौऱ्याच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे आज आदित्य ठाकरे शरद पवारांच्या भेटीला जाणार का? याकडे सगळ्याचं लागलं होतं. पण, आदित्य ठाकरेंनी पवारांना दिल्लीत भेटणार नाही. आम्ही मुंबईत नेहमी भेटतो... असं म्हणून दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवालींची भेट घेतली..
पण, चर्चा झाली.. ती न झालेल्या भेटीचीच... आणि त्यावर होता आपला आजचा प्रश्न.. जो पाहण्यासाठी जाऊयात पोल सेंटरला...