✕
  • मुख्यपृष्ठ
  • INDIA AT 2047
  • IPL 2024
  • क्रिकेट
  • निवडणूक
  • अयोध्या राम मंदिर
  • भारत
  • विश्व
  • महापालिका निवडणूक 2022
  • टेलिव्हिजन
  • सिनेमा
  • औरंगाबाद
  • उस्मानाबाद
  • मुंबई
  • पुणे
  • नाशिक
  • नागपूर
  • कोल्हापूर
  • सोलापूर
  • क्रीडा
  • फोटो
  • राशीभविष्य
  • वेब स्टोरी
  • वर वधू
  • धार्मिक
  • शिक्षण
  • ट्रेंडिंग न्यूज
  • आरोग्य
  • लाईफस्टाईल
  • क्राईम
  • राजकारण
  • शेत-शिवार
  • व्यापार-उद्योग
  • पर्सनल फायनान्स
  • म्युच्युअल फंड्स
  • आयपीओ
  • जॅाब माझा
  • ऑटो
  • टेक-गॅजेट
  • ब्लॉग
  • उपयुक्तता
  • संपर्क करा
  • IDEAS OF INDIA

Zero Hour : 6 July | पावसात अनेक ठिकाणी नव्या विकासकामांची दुर्दशा झालीय, याला कारणीभूत कोण?

abp majha web team  |  06 Jul 2026 10:34 PM (IST)
ABP News

महाराष्ट्राचा सर्वात मोठा सांस्कृतिक सोहळा म्हणजे पंढरपूरची आषाढवारी अवघ्या काही तासांवर आलीय. आणि अवघ्या महाराष्ट्रासमोर महाप्रलयाचं मोठं संकट येऊन उभं ठाकलंय. मुंबईसह आसपासच्या महानगरांमध्ये गेल्या चार दिवसांपासून पाऊस कोसळतोय. मुंबईत महिन्याभराचा सरासरी पाऊस तर अवघ्या चार दिवसांमध्ये झालाय. पण चिंता अजूनही कायम आहे. कारण भारतीय हवामान खात्यानं उद्या नाशिक आणि पुण्याच्या घाटमाथ्यासह पालघर आणि रायगड जिल्ह्यात रेड अलर्ट जारी केला आहे. मुंबई आणि ठाण्यासह नाशिक, रत्नागिरी, सातारा घाटमाथा, अकोला आणि अमरावती जिल्ह्यात ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. नाशिक जिल्ह्यातल्या त्र्यंबकेश्वर आणि आसपासच्या परिसरात ढगफुटी होण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. आणि तसं झालं तर या परिसरात ३०० मिलीमीटरच्या आसपास पाऊस पडण्याची भीती वर्तवण्यात आली आहे. त्यामुळं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातल्या आपत्ती व्यवस्थापनाचा आढावा घेऊन सर्व यंत्रणांना येत्या आठ जुलैपर्यंत सज्ज राहण्याचे आज आदेश दिले.


नमस्कार, मी विजय साळवी. एबीपी माझाच्या झीरो अवर या विशेष कार्यक्रमात आपलं स्वागत.


मंडळी, महाराष्ट्राची सर्वात मोठी आध्यात्मिक परंपरा असलेल्या आषाढीच्या वारीला पुढच्या दोन दिवसांत सुरुवात होणार आहे. पालखी सोहळ्याच्या परंपरेनुसार संत तुकोबारायांची पालखी उद्या देहूमधून, तर संत ज्ञानोबा माऊलींची पालखी परवा आळंदीमधून पंढरपूरच्या दिशेनं प्रस्थान ठेवणार आहे. महाराष्ट्राच्या या सर्वात मोठ्या सांस्कृतिक सोहळ्यावर महाप्रलयाचं सावट आहे. त्याचवेळी आज दिवसभर झालेल्या पावसानं मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर संकटांची मालिका उभी राहिली. मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवरचा प्रवास अधिक वेगवान करण्यासाठी बांधण्यात आलेला तब्बल तास हजार कोटींचा मिसिंग लिंक प्रकल्प सुरु होऊन जेमतेम नऊ आठवडे झाले आहेत. पण पहिल्याच मोठ्या पावसात तो प्रकल्प धोकादायक असल्याचं दिसून आलं. या मार्गावर आज दरड कोसळल्यामुळं तो वाहतुकीसाठी बंद करण्याची वेळ आली. त्यामुळं मिसिंग लिंकवरच्या प्रवासाची सुरक्षितता आणि तिथल्या रस्त्याचा दर्जा याविषयी चिंता व्यक्त करण्यात येत आहे.


मुंबई-गोवा, मुंबई-अहमदाबाद आणि मुंबई-नाशिक महामार्गांवरही सध्याची परिस्थिती चिंता करायला लावणारी आहे. त्या पार्श्वभूमीवर राज्य आपत्ती नियंत्रण कक्षामध्ये आयोजित बैठकीला उपस्थित राहून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुसळधार पावसामुळं निर्माण झालेल्या परिस्थितीचा सविस्तर आढावा घेतला. संबंधित सुरक्षायंत्रणांनी २४ तास अलर्ट मोडवर राहून, संभाव्य आपत्कालीन परिस्थितीत तातडीनं मदतकार्य करावं, असे निर्देश मुख्यमंत्री फडणवीसांनी दिले आहेत. राज्यभरात पुढच्या काही तासांत मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता असल्यानं आज आणि उद्या अत्यावश्यक काम असल्याशिवाय घराबाहेर पडू नये, असं आवाहन मुख्यमंत्र्यांनी केलं आहे... दरम्या 

Continues below advertisement
  • मुख्यपृष्ठ
  • टीवी शोज
  • झीरो अवर
  • Zero Hour : 6 July | पावसात अनेक ठिकाणी नव्या विकासकामांची दुर्दशा झालीय, याला कारणीभूत कोण?

TRENDING VIDEOS

Breaking News : Lucknow में अरशद नाम के युवक ने अपनी मां समेत 4 बहनों की हत्या की1 Year ago

Sambhal News : जुमे की नमाज से पहले छावनी बना संभल...चप्पे-चप्पे पर नजर | Breaking News1 Year ago

Badrinath Dham Kapaat: आज से खुले बद्रीनाथ धाम के कपाट, दर्शन के लिए उमड़े श्रद्धालु | Uttarakhand2 Year ago

UP Politics: लोकसभा चुनाव में सपा-कांग्रेस का यूपी में क्या होगा, मंत्री Narendra Kashyap ने बताया2 Year ago

Continues below advertisement
About us | Advertisement| Privacy policy
© Copyright@2026.ABP Network Private Limited. All rights reserved.