Zero Hour : मतदानावर बहिष्कार टाकूनअडचणी सुटतात का? राज्यातील जनतेचा कौल काय सांगतो
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppZero Hour : मतदानावर बहिष्कार टाकूनअडचणी सुटतात का? राज्यातील जनतेचा कौल काय सांगतो राज्यात लोकसभा निवडणुकीची धामधूम जोरात सुरू आहे. निवडणूक आयोगाकडून अधिकाधिक मतदान होण्यासाठी वेगवेगळ्या उपाययोजना राबवल्या जात आहेत. सोबतच सर्वच राजकीय पक्षांकडून मतदान करण्याचे आवाहन मतदारांना केले जात आहे. असे असतानाही प्रत्येक वेळी निवडणूक आली की मतदानावर बहिष्कार घालण्याची घोषणा कानावर पडतेच. राज्यातील वेगवेगळ्या लोकसभा मतदारसंघातील मतदारांनी आपल्या मागण्यांसाठी मतदानावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला आहे.
राज्यात पासष्ट गावातील एक्केचाळीस हजार चारशे चाळीस मतदारांनी मतदानावर बहिष्कार टाकण्याची घोषणा केली आहे. विशेष म्हणजे माढा आणि बारामती लोकसभा मतदारसंघात सर्वाधिक मतदारांनी निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचं ठरवलं आहे. कुठे रस्ते, पाणी, मराठा आरक्षणासाठी.. कुठे रेल्वे गाडी सुरू करावी म्हणून तर बीड जिल्ह्यातील एका गावाने मोबाईल टॉवरसाठी निवडणुकीवर बहिष्कार टाकायंच ठरवलं आहे, याबाबतची सविस्तर आकडेवारी पाहुयात या ग्राफिक्समधून..