Pune Land Row Zero Hour : जैन बोर्डिंगच्या वादाला नवं वळण, पालिका निवडणुकीत मुद्दा तापणार?
abp majha web team Updated at: 27 Oct 2025 09:02 PM (IST)
पुण्यातील जैन बोर्डिंगच्या (Jain Boarding) जागेच्या वादग्रस्त व्यवहारात रोज नवे वळण येत असून आता बिल्डर विशाल गोखले (Vishal Gokhale) यांनी हा व्यवहार रद्द करत असल्याचे ईमेलद्वारे ट्रस्टला कळवले आहे. या प्रकरणात काँग्रेस नेते रवींद्र धंगेकर (Ravindra Dhangekar), वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी (Raju Shetti) यांनी उडी घेतल्याने राजकारण तापले आहे. 'यापुढे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा किंवा भारतीय जनता पार्टीवर टीका करण्याची तुमची लायकी नाही, तुम्हाला जशास तसं उत्तर दिलं जाईल', असा थेट इशारा भाजपने धंगेकरांना दिला आहे. बिल्डरने व्यवहार रद्द करण्याची घोषणा केली असली तरी, जोपर्यंत प्रॉपर्टी कार्डवर जैन बोर्डिंगचे नाव पुन्हा लागत नाही, तोपर्यंत लढा सुरूच ठेवणार असल्याची भूमिका राजू शेट्टी यांनी घेतली आहे. तर, जुन्या ट्रस्टच्या जागा गरज नसताना विकल्या जात असल्याचा आरोप प्रकाश आंबेडकर यांनी केला आहे. या प्रकरणी आता धर्मादाय आयुक्तांच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.