Zero Hour Sachin Sawant : महायुतीत महाकुस्ती चालूय, एकनाथ शिंदेंची कुचंबणा
abp majha web team | 16 Oct 2025 09:34 PM (IST)
महाराष्ट्रातील आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडी (MVA) आणि महायुतीमधील राजकीय घडामोडींना वेग आला आहे. काँग्रेस (Congress) नेते सचिन सावंत (Sachin Sawant) यांनी आघाडीतील मतभेदांवर बोट ठेवले आहे. 'स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका या कार्यकर्त्यांच्या निवडणुका असतात आणि स्थानिक नेतृत्त्वाच्या इच्छेनुसारच हायकमांड निर्णय घेईल', असे महत्त्वपूर्ण विधान सचिन सावंत यांनी केले आहे. यातून त्यांनी स्थानिक पातळीवर काँग्रेस स्वबळावर लढण्याचे संकेत दिले आहेत. दुसरीकडे, महायुतीमध्येही सर्व काही आलबेल नसल्याचा दावा त्यांनी केला. एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या कार्यक्रमांना भाजप नेत्यांची अनुपस्थिती आणि शिंदे गटाची होणारी कुचंबणा यावर त्यांनी प्रकाश टाकला. मनसेच्या (MNS) महाविकास आघाडीतील संभाव्य समावेशावरूनही काँग्रेसमध्ये नाराजी असल्याचे या चर्चेतून समोर आले आहे. विदर्भात, विशेषतः नागपुरात काँग्रेस हा भाजपला थेट टक्कर देणारा पक्ष असल्याने तिथे कार्यकर्त्यांच्या मतानुसार निर्णय घेतला जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.