Zero Hour Gajanan Kale : मतदारयाद्यांच्या पडताळणीला भाजप-शिंदेंच्या सेनेचा आक्षेप का?
abp majha web team | 30 Oct 2025 09:42 PM (IST)
या चर्चेत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (MNS) नेते गजानन काळे यांनी मतदार यादीतील गंभीर त्रुटींचा मुद्दा उपस्थित केला, तर शिंदे गटाचे प्रवक्ते नवनाथ बन यांनी त्याला प्रत्युत्तर दिले. 'तुम्ही विरोधात असताना ईव्हीएमबद्दल बोलणार आणि सत्तेत आल्यानंतर आम्ही जर ईव्हीएम बद्दल बोलतोय, मतदार यादी बद्दल बोलतोय तर तुम्हाला मात्र अडचण,' असा थेट सवाल गजानन काळे यांनी सत्ताधाऱ्यांना केला. नवी मुंबईतील मतदार याद्यांमध्ये मोठ्या प्रमाणात घोळ असल्याचा आरोप MNSने केला आहे. यामध्ये एका सार्वजनिक शौचालयाच्या पत्त्यावर मतदारांची नोंद असणे आणि नवी मुंबई महानगरपालिका आयुक्तांच्या घराच्या पत्त्यावर दीडशेहून अधिक मतदारांची नोंद असल्याचा दावा करण्यात आला. याद्यांच्या शुद्धीकरणाशिवाय निवडणुका घेऊ नयेत, अशी मागणी MNS करत असून, याला भाजप आणि शिंदे गटाचा आक्षेप का आहे, असा प्रश्नही चर्चेदरम्यान उपस्थित करण्यात आला. जुन्या काळात भाजप नेते किरीट सोमय्या यांनीच ईव्हीएम हॅक होऊ शकते हे दाखवून दिले होते, याची आठवणही गजानन काळे यांनी करून दिली.