Laxman Hake : विखे पाटील महामूर्ख, ओबीसींनी त्यांना मतदान करू नये- हाके
abp majha web team | 10 Oct 2025 09:02 PM (IST)
OBC नेते लक्ष्मण हाके (Laxman Hake) आणि मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष राधाकृष्ण विखे-पाटील (Radhakrishna Vikhe Patil) यांच्यातील संघर्ष मराठा आरक्षणामुळे (Maratha Reservation) अधिकच चिघळला आहे. 'विखे नावाच्या माणसाच्या डोक्यावर परिणाम झालाय, तो एक मूर्ख माणूस आहे', अशा अत्यंत कठोर शब्दांत लक्ष्मण हाके यांनी विखे-पाटील यांच्यावर हल्लाबोल केला. मनोज जरांगे (Manoj Jarange) यांच्याशी झालेल्या भेटीनंतर, 'जीआर न्यायप्रविष्ट असल्याने त्यात बदल करता येणार नाही' या विखे-पाटील यांच्या वक्तव्यावर हाके यांनी ही संतप्त प्रतिक्रिया दिली. विखे-पाटील हे केवळ कारखानदारांचे नेते असून त्यांना संविधानातील आरक्षणाचे तत्व मान्य नाही, असा आरोपही हाके यांनी केला. या वादामुळे ओबीसी आणि मराठा नेत्यांमधील दरी दिवसेंदिवस वाढत असल्याचे स्पष्ट झाले आहे.