Zero Hour Maratha vs OBC : मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्रं,ओबीसींना खाडाखोडीची शंका
abp majha web team
Updated at:
17 Sep 2025 09:02 PM (IST)
मराठवाडा मुक्तिदिनानिमित्त मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र वाटप सुरू झाले. हैदराबाद गझेट आणि शिंदे समितीच्या नोंदीनुसार ही प्रमाणपत्रे दिली जात आहेत. बीड, हिंगोली, धाराशिव, लातूर आणि परभणी जिल्ह्यांमध्ये वाटप झाले. मात्र, या वाटपावरून नवा वाद निर्माण झाला आहे. मंत्री छगन भुजबळ यांनी प्रमाणपत्र वाटपात खाडाखोड केलेल्या किंवा बोगस कागदपत्रांचा वापर होत असल्याचा आरोप केला आहे. त्यांनी ओबीसी मंत्रिमंडळ उपसमितीसमोर पुरावे सादर केले. ओबीसी समाजाने याविरोधात रस्त्यावर उतरून आंदोलन केले. बीडमध्ये मुख्यमंत्र्यांसमोर घोषणाबाजी झाली, तर कळमनुरी येथे लक्ष्मण हाके यांच्या नेतृत्वाखाली मोर्चा काढण्यात आला. जीआर रद्द करण्याची मागणी पुन्हा एकदा उचलून धरली आहे. ओबीसी महासंघाचे अध्यक्ष बबनराव तायवडे यांनी माहिती अधिकाराचा वापर करून बोगस प्रमाणपत्रांवर लक्ष ठेवण्याचे आवाहन केले. ओबीसी मंत्रिमंडळ समितीचे अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी "फोडतोड डॉक्युमेंट वर किंवा फोर्जेरी डॉक्युमेंटस् जाऊ नये किंवा चुकीच्या पद्धतीनं दिलेल्या त्या ठिकाणी पुराव्यावर होऊ नये," अशी सूचना अधिकाऱ्यांना केली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नियमानुसार पात्र असलेल्यांनाच दाखले मिळतील असे स्पष्ट केले. छत्रपती संभाजीनगर येथे मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमातही ओबीसी कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी केली. दुसरीकडे, उद्धव ठाकरे यांनी शिवसेना भवनमध्ये शाखाप्रमुखांना मार्गदर्शन केले. जो आपल्यासोबत येईल त्याला शंभर टक्के साथ देण्याचे आवाहन त्यांनी केले. बंजारा समाजानेही एसटी आरक्षणासाठी जळगाव आणि अकोल्यात मोर्चे काढले.