Zero Hour : मतदार याद्यांवरून रणकंदन, शिष्टमंडळ आयोगाची पुन्हा भेट घेणार, कशी चर्चा होणार?
abp majha web team | 14 Oct 2025 09:26 PM (IST)
महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मतदार याद्या आणि VVPAT च्या वापरावरून राजकीय वातावरण तापले आहे. उद्धव ठाकरे, शरद पवार, आणि राज ठाकरे यांच्यासह विरोधी पक्षाच्या नेत्यांनी निवडणूक प्रक्रियेच्या पारदर्शकतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत. 'आम्ही हरणार आहोत, याची ही कबुली आहे', अशा शब्दात सत्ताधारी पक्षाचे नेते संजय शिरसाट यांनी विरोधकांच्या मागणीला 'नाचता येईना अंगण वाकडं' म्हणत टीका केली आहे. VVPAT चा वापर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये व्हावा आणि VVPAT मधील चिठ्यांची १००% मोजणी व्हावी, अशी मागणी उद्धव ठाकरे यांनी लावून धरली आहे. विधानसभा निवडणुकीपूर्वी मतदार याद्यांवर घेतलेल्या आक्षेपांचे निराकरण झालेले नाही आणि डुप्लिकेट मतदार वगळले नाहीत, असा दावा विरोधकांनी केला आहे. तर, सत्ताधारी पक्षाने विरोधकांवर दुटप्पीपणाचा आरोप करत, बिहारमध्ये एसआयआरला (Special Intensive Revision) विरोध आणि महाराष्ट्रात वेगळी भूमिका का, असा सवाल केला आहे.