Zero Hour Lok Sabha Elections Boycott महाराष्ट्र-कर्नाटक सीमेवरील गावानं का घातला मतदानावर बहिष्कार?
abp majha web team | 07 May 2024 12:02 AM (IST)
Maharashtra Loksabha Election : महाराष्ट्रात कर्नाटक सीमेवर कर्नाटक सरकारने 28 कोटी रुपये खर्चून कृष्णा नदीवर खिद्रापूर गावाच्या सीमेपर्यंत पूल बांधले आहे. मात्र, पुलाची महाराष्ट्राच्या बाजूची उतरंड ( रॅम्प किंवा पोहोच रस्ता) बांधण्यासाठी महाराष्ट्रातील काही शेतकऱ्यांची शेती अधिग्रहीत करून देण्याची जबाबदारी महाराष्ट्र सरकारने पूर्ण केलेली नाही. त्यामुळे गेली दोन वर्ष पुलाचे बांधकाम अर्धवट स्थितीत आहे. परिणामी खिद्रापूर आणि त्याच्या अवतीभवतीच्या महाराष्ट्रातील गावांमधील नागरिक कर्नाटकात ये जा करू शकत नाही.