Zero Hour : Nitesh Rane यांच्या धमकीवर Imtiyaz Jaleel यांचा पलटवार
abp majha web team | 10 Oct 2025 09:38 PM (IST)
चिथावणीखोर विधानांवरून (Inflammatory Statements) राजकारण तापले असून, AIMIM नेते इम्तियाज जलील (Imtiaz Jaleel) आणि भाजप आमदार नितेश राणे (Nitesh Rane) यांच्यात शाब्दिक युद्ध पेटले आहे. 'तुम्ही मशिदीमध्ये घुसून मारण्याची भाषा करणाऱ्यांवर आधी कारवाई करा, मग मी किंवा वारिस पठाणही (Waris Pathan) कारवाईला तयार आहोत', असं थेट आव्हान इम्तियाज जलील यांनी दिले आहे. जलील यांनी पोलिसांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत, केवळ विशिष्ट समाजाच्या नेत्यांवर कारवाई होत असल्याचा आरोप केला. दुसरीकडे, महायुतीचे नेते सिद्धार्थजी यांनी हा केवळ विकासाच्या मुद्द्यांवरून लक्ष हटवण्याचा प्रयत्न असल्याचे म्हटले आहे. नवी मुंबई विमानतळासारखी विकासाची कामे सुरू असताना, विरोधक मुद्दाम असे मुद्दे उपस्थित करत असल्याचा दावा त्यांनी केला. मात्र, प्रत्येक पक्षात असे चिथावणीखोर विधानं करणारे नेते, जसे की गोपीचंद पडळकर (Gopichand Padalkar) आहेत, याकडे वृत्तनिवेदिकेने लक्ष वेधले.