Zero Hour Sachin Sawant : राहुल गांधींच्या मुळ प्रश्नांना निवडणूक आयोगाने उत्तर दिलं नाही
abp majha web team | 05 Nov 2025 10:18 PM (IST)
काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी हरियाणा निवडणुकीत झालेल्या कथित मतदार घोटाळ्यावरून केलेल्या आरोपांवरून राजकीय वातावरण तापले आहे. या चर्चेत काँग्रेस नेते सचिन सावंत यांनी पक्षाची बाजू मांडली. 'हरियाणाचं सरकारच एका पद्धतीने चोरलेलं भाजपाने,' असा थेट दावा या चर्चेत करण्यात आला. राहुल गांधी यांनी पत्रकार परिषदेत आरोप केला की, हरियाणाच्या मतदार यादीत सुमारे २५ लाख मतदार बनावट असून यात १९ लाखांपेक्षा जास्त बल्क मतदार आहेत. एका 'ब्राझिलियन मॉडेल'चा फोटो तब्बल २२ वेळा वेगवेगळ्या नावांनी मतदार यादीत वापरण्यात आल्याचा धक्कादायक दावाही त्यांनी केला. याउलट, निवडणूक आयोगाने हे सर्व आरोप निराधार असल्याचे म्हटले असून, मतदार यादीवर काँग्रेसच्या बूथ एजंटांनी त्यावेळी आक्षेप का घेतला नाही, असा सवाल उपस्थित केला आहे.