Dhananjay Munde Zero Hour :बीड ते बारामती... कहीं खुशी, कहीं गम; धंनजय मुंडेंचा राजीनामा आणि राजकारण

Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appमंडळी आज महाराष्ट्राच्या राजकारणासह समाजकारणात अनेक महत्वाच्या घडामोडी घडल्यात.. आणि त्याचा थेट परिणाम आपल्या दैनंदिन आयुष्यावर होणारय.. याच घडामोडींची सुरुवात झाली ती राजधानी मुंबईतून...
राज्य मंत्रिमंडळाची एक बैठक आज पार पडली.. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या दावोस दौऱ्यानंतर ही मंत्रिमंडळाची पहिलीच बैठक असल्यानं त्याकडे राज्याचं लक्ष लागलं होतं.. इतकंच नाही तर याच बैठकीत आणखी एका गोष्टीकडे लक्ष लागलं होतं.. ती म्हणजे बीडचं हत्याकांड ते मंत्री धनंजय मुंडेंवरचे आरोप... त्याचसंदर्भातील दोन अत्यंत महत्वाचे अपडेट आपण आजच्या भागात पाहणार आहोत.. त्याचं विश्लेषणही करणार आहोत..
बीड प्रकरणावरुन महायुतीचं टेन्शन वाढलंय.. पण आणखी एक घडामोड झालीय पुण्यात.. ती होती ठाकरेंच्या शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांची बैठक.. त्यात खासदार संजय राऊत आणि उपनेत्या सुषमा अंधारे होत्या.. आणि याच बैठकीत बारामती, पुरंदर आणि इंदापूरच्या पदाधिकाऱ्यांनी थेट खासदार सुप्रिया सुळेंची तक्रार केली.. त्यावरुन महाविकास आघाडीतही धुसफूस सुरु आहे की काय? अशाही चर्चा रंगल्यायत.. याच तक्रारींवर खासदार सुळेंनी काय प्रतिक्रिया दिली तीही आपण आजच्या भागात पाहणार आहोत..
बारामतीतून पुन्हा एकदा बीडमध्ये जाऊयात.. तिथं मराठा आरक्षणासाठी मनोज जरागेंनी पुन्हा सुरु केलेल्या उपोषणाचा चौथा दिवस संपला.. आज त्यांच्या भेटीला मस्साजोगचे दिवंगत सरपंच संतोष देशमुखांचं कुटुंब आलं होतं.. संतोष देशमुखांच्या कुटुंबियांनी जरागेंना पाणी पिण्याची विनंती केली.. जरांगेंनी ती विनंती मान्य करून पाणी घेतलं.. पण उपोषण सुरुच ठेवलं...
मंडळी.. असं असलं तरी स्टोरी ऑफ द डे ठरली.. ती राज्य मंत्रिमंडळाची बैठक आणि धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी.. आणि याच बातमीनं सुरु करुयात आजच्या झीरो अवरला..