Zero Hour Atul Bhatkhalkar: बेशरमपणाचं वक्तव्य...मोदींवर टीका करणाऱ्या काँग्रेसवर भातखळकर संतापले
abp majha web team | 11 Nov 2025 09:50 PM (IST)
दिल्लीतील लाल किल्ल्याजवळ झालेल्या बॉम्बस्फोटाच्या पार्श्वभूमीवर (Delhi Red Fort Blast) राष्ट्रीय सुरक्षेच्या मुद्द्यावरून राजकीय चर्चा तापली आहे. या चर्चेत काँग्रेसचे प्रवक्ते अतुल लोंढे (Atul Londe) यांनी सरकारवर जोरदार टीका केली. '370 रद्द केल्यानंतर पूर्ण कंट्रोल आहे असं म्हणल्यानंतर, दिल्लीच्या लाल किल्ल्याजवळ जर बॉम्बस्फोट होत असेल तर ती गंभीर बाब आहे,' असे म्हणत लोंढे यांनी सरकारच्या सुरक्षेच्या दाव्यांवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. या चर्चेदरम्यान, नुकत्याच झालेल्या पहलगगाम दहशतवादी हल्ल्याचा (Pahalgam Terror Attack) आणि त्याला प्रत्युत्तर म्हणून केलेल्या 'ऑपरेशन सिंदूर'चा (Operation Sindoor) उल्लेख करण्यात आला. तसेच, 26/11 हल्ल्यानंतर तत्कालीन यूपीए सरकारने कारवाई का केली नाही, यावर पी. चिदंबरम यांच्या नुकत्याच केलेल्या वक्तव्याचा संदर्भही देण्यात आला. सत्ताधारी पक्षाच्या प्रतिनिधींनी सरकारच्या दहशतवादविरोधी कठोर भूमिकेचे समर्थन करत, मागील सरकारच्या तुलनेत सध्याची सुरक्षा यंत्रणा अधिक सक्षम असल्याचा दावा केला.