Zero Hour : 'कर्जमाफी घेतल्याशिवाय हटणार नाही', बच्चू कडूंचा सरकारला इशारा
abp majha web team | 28 Oct 2025 09:42 PM (IST)
शेतकरी नेते बच्चू कडू (Bachchu Kadu) यांनी कर्जमाफीच्या (Loan Waiver) मागणीसाठी पुन्हा एकदा आंदोलनाचे शस्त्र उगारले आहे. 'जगाच्या पोशिंद्याला स्वतःच्या मुलांसाठी स्वप्न बघण्याचा अधिकार राहिलेला नाही,' या शब्दात शेतकऱ्यांची व्यथा मांडत हे आंदोलन सुरू झाले आहे. एकीकडे 'मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण' (Ladki Behan Yojana) सारख्या योजना आणि पूरग्रस्तांना जाहीर केलेल्या मदतीमुळे तिजोरीवर आर्थिक भार असताना, कर्जमाफी कशी द्यायची, या पेचात सरकार सापडले आहे. विशेष म्हणजे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बोलावलेल्या बैठकीला उपस्थित राहण्यास बच्चू कडू यांनी नकार दिला आहे. जोपर्यंत सरकार कर्जमाफीचा ठोस निर्णय घेत नाही, तोपर्यंत नागपूर सोडणार नाही, असा इशारा त्यांनी दिला आहे. या आंदोलनामुळे शरद जोशी (Sharad Joshi) यांच्या 'भीक नको, हवे घामाचे दाम' या घोषणेची आठवण होत असून, शेतकऱ्यांच्या मूळ आर्थिक स्वातंत्र्याचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.