Zero Hour Voter List Scam : मतदार याद्यांवरून नवा वाद, 'व्होट जिहाद'चा गंभीर आरोप
abp majha web team | 03 Nov 2025 09:14 PM (IST)
झीरो अवरमध्ये निपुणी भावे यांच्यासोबत मतदार याद्यांमधील कथित घोळावरून पेटलेल्या राजकारणावर चर्चा. भाजपचे मंत्री आशिष शेलार यांनी पत्रकार परिषद घेऊन महाविकास आघाडी आणि मनसेवर 'व्होट जिहाद'चा आरोप केला, तर दुसरीकडे उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनी मतदार याद्यांमध्ये घोळ असल्याचा दावा करत सरकारवर निशाणा साधला. 'सरकार तुमचं असताना विरोधक घोटाळे करतात, म्हणजे तुम्ही सरकार चालवायला नालायक आहात,' असा थेट हल्ला उद्धव ठाकरेंनी केला. शेलार यांनी काही मतदारसंघांमध्ये विजयी उमेदवारांच्या मताधिक्यापेक्षा जास्त मुस्लिम दुबार मतदार असल्याचा दावा केला. त्यांनी मविआ नेत्यांच्या मतदारसंघातील आकडेवारी सादर करत, ठाकरे बंधूंना केवळ हिंदू मतदारच का दिसले, असा सवाल विचारला. या नव्या वादामुळे महाराष्ट्राचे राजकारण आणखी तापण्याची शक्यता आहे.