Vare Nivadnukiche Superfast News: विधानसभा निवडणुकीच्या बातम्या: वारे निवडणुकीचे : 08 ऑक्टोबर 2024
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appमहाविकास आघाडीच्या बैठकीत जागावाटपावर सकारात्मक चर्चा, सर्व जागांचा तिढा जवळपास सुटल्याची माहिती, 11 ऑक्टोबरला महाविकास आघाडीची पत्रकार परिषद पार पडणार.
उपमुख्यमंत्री अजित पवारांनी बारामतीतून उभे राहावं यासाठी कार्यकर्ते गाडीसमोर आक्रमक, अजित पवारांनी स्वतःची उमेदवारी जाहीर करावी, कार्यकर्त्यांची मागणी.
एबीपी माझाच्या बातमीवर शिक्कामोर्तब. अजित पवारच बारामती विधानसभेतून निवडणूक लढवणार, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष प्रफुल पटेल यांची घोषणा.
जागावाटपावर चर्चा सुरु आहे, महायुतीत कोणताही वाद नाही, दस-याच्या आधी जागा वाटपाचा विषय संपेल. प्रफुल पटेल यांची माहिती. तसेच राजराजे निंबाळकर दूर जाणार नसल्याचीही दिली प्रतिक्रिया.
उमेदवार निवडीसाठी देवेंद्र फडणवीसांच्या निवासस्थानी बैठक. दोन्ही प्रभारी भूपेंद्र यादव, अश्विनी वैष्णव, चंद्रशेखर बावनकुळे, पंकजा मुंडे, रावसाहेब दानवे बैठकीला उपस्थित. उमेदवार निवडीची प्रक्रिया अंतिम टप्प्यात.
फेक नरेटिव्हवर एखादी निवडणूक जिंकता येते, पण काम करून वारंवार निवडणूक जिंकता येते, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा विरोधकांना टोला.
काँग्रेस नेते राहुल गांधी विरोधी पक्षनेते झाल्यावर हरियाणाने पहिली सलामी दिली, दुसरी सलामी महाराष्ट्र देईल, हरियाणा विधानसभेच्या निकालावरून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची राहुल गांधींवर टीका.
महायुतीला सर्वात मोठा विजय नोव्हेंबरच्या निवडणुकीत महाराष्ट्रात मिळेल, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंना विश्वास.