Zero Hour : पालिकेच्या उमेदवारी अर्जासाठी उरले अवघे काही तास, सर्वाधिक बंडखोरी कोणत्या पक्षात?

एबीपी माझा वेब टीम  |  29 Dec 2025 09:49 PM (IST)
ABP News

Zero Hour : पालिकेच्या उमेदवारी अर्जासाठी उरले अवघे काही तास, सर्वाधिक बंडखोरी कोणत्या पक्षात?
अनेक महापालिकांमध्ये आजच्या लढती स्पष्ट झाल्या..   ( कोल्हापूर महानगरपालिकासोडून अनेक मोठ्या महापालिकांमध्ये महायुतीच्या एकजुटीच्या ठिकऱ्या उडल्यात.. मुंबईत भाजप-शिवसेना एकत्र लढतेय.. दादांनी वेगळी वाट धरली.. पण, ठाणे, पुणे, नागपुरात भाजप-सेनेत अजूनही जागावाटपावरुन तणाव आहे.. तर नवी मुंबई, नाशिक, अकोला, पिंपरी-चिंचवड, अमरावतीसह अनेक ठिकाणी भाजप-सेनेत स्पष्ट काडीमोड झालाय. पण, हे चित्र फक्त महापालिकेचं आहे. हे विसरु नका.. कारण, राज्याच्या सत्तेत मात्र हेच भाजप-शिवसेना आणि राष्ट्रवादी एकत्र आहेत.. ) (असो, गेल्या आठवड्यात निवडणुका जाहीर झाल्या. अर्ज विकले गेले. पण अर्ज दाखल करण्याच्या केंद्रांवर गर्दी काही दिसत नव्हती.. पण, आजचा दिवस  कही खुशी.. कही गम... यासाठीच ठरला की, महाराष्ट्रातील 29 महापालिका निवडणुकांसाठी, प्रमुख राजकीय पक्षांनी उमेदवाऱ्या जाहीर अखेर करायला सुरुवात केली. तशी, अर्ज दाखल करायची प्रक्रिया  आठवड्याभरापूर्वीच सुरुवात झालीय. पण, बंडखोर, उमेदवार पळवापळवी, याच भीतीनं जवळपास सगळ्याच पक्षांनी गेला आठवडा भर कोणतीही उमेदवारी जाहीर केलीच नाही.) (पण त्यामुळे आता हा प्रश्न पडतोय की कोणत्याही राजकीय पक्षाला उमेदवार विश्वास राहिला नाहीये का की त्यांचा जाहीर केलेला उमेदवार मतदानापर्यंततरी त्याच्याबरोबर असेल?)  (एक सोलापुरातलं उदाहरण देते... इथं काँग्रेसनं फिरदोस पटेल यांना उमेदवारी दिली.. त्यानंतर त्यांनी अवघ्या एका दिवसात एमआयएममध्ये प्रवेश केला..) ( हे एक झालं, अशी अनेक उदाहरण आहेत! त्यामुळेच की काय, प्रमुख पक्षांनी उमेदवाऱ्या जाहीर केल्या नाहीत.) (काल तर अजित पवारांनी पिंपरी प्रचाराचा नारळ फोडला.. तिथं भाजपच्याच कारभावर टीकाही केली. पण, भाजपकडून उमेदवाऱ्या जाहीर होत नाही तोवर मी जागावाटपाचे आकडे जाहीर करणार नाही.. अशी स्पष्ट घोषणाही केली..)  (तर मुंबईत ठाकरेंचे खासदार संजय राऊत म्हणतात की आम्ही कधीच उमदेवारी याद्या जाहीर केल्या नाहीत. थेट उमेदवारांनाच अर्ज देत असतो. या नियमानो त्यांनी आज एबी फॉर्म्स द्यायला सुरुवात केलीही. पण,  दिवसभरात तीनवेळा मातोश्रीवर फेऱ्या मारल्यानंतर.. संध्याकाळी साडेसात वाजता, माजी महापौर किशोरी पेडणेकरांना एबी फॉर्म मिळालाय.. )  (तिकडे नागपुरात भाजपनं बंडखोरीवर उपाय म्हणून एक- दोन नाही तर तिनशे इच्छुकांना अर्ज भरायला सांगितलंय.)  (आता एवढे सगळे उपाय करून शेवटी बंडखोरी रोखण्यात कोणत्या पक्षाला यश येईल, हे तर अवघ्या काही तासांमध्येच कळेल. 

  • मुख्यपृष्ठ
  • टीवी शोज
  • स्पेशल रिपोर्ट
  • Zero Hour : पालिकेच्या उमेदवारी अर्जासाठी उरले अवघे काही तास, सर्वाधिक बंडखोरी कोणत्या पक्षात?

TRENDING VIDEOS

Breaking News : Lucknow में अरशद नाम के युवक ने अपनी मां समेत 4 बहनों की हत्या की1 Year ago

Sambhal News : जुमे की नमाज से पहले छावनी बना संभल...चप्पे-चप्पे पर नजर | Breaking News1 Year ago

Badrinath Dham Kapaat: आज से खुले बद्रीनाथ धाम के कपाट, दर्शन के लिए उमड़े श्रद्धालु | Uttarakhand2 Year ago

UP Politics: लोकसभा चुनाव में सपा-कांग्रेस का यूपी में क्या होगा, मंत्री Narendra Kashyap ने बताया2 Year ago

About us | Advertisement| Privacy policy
© Copyright@2026.ABP Network Private Limited. All rights reserved.
  • मुख्यपृष्ठ
  • INDIA AT 2047
  • IPL 2024
  • क्रिकेट
  • निवडणूक
  • अयोध्या राम मंदिर
  • भारत
  • विश्व
  • महापालिका निवडणूक 2022
  • टेलिव्हिजन
  • सिनेमा
  • औरंगाबाद
  • उस्मानाबाद
  • मुंबई
  • पुणे
  • नाशिक
  • नागपूर
  • कोल्हापूर
  • सोलापूर
  • क्रीडा
  • फोटो
  • राशीभविष्य
  • वेब स्टोरी
  • वर वधू
  • धार्मिक
  • शिक्षण
  • ट्रेंडिंग न्यूज
  • आरोग्य
  • लाईफस्टाईल
  • क्राईम
  • राजकारण
  • शेत-शिवार
  • व्यापार-उद्योग
  • पर्सनल फायनान्स
  • म्युच्युअल फंड्स
  • आयपीओ
  • जॅाब माझा
  • ऑटो
  • टेक-गॅजेट
  • ब्लॉग
  • उपयुक्तता
  • संपर्क करा
  • IDEAS OF INDIA