Instagram ला माहितीची चोरी होण्यापासून सावध केलं, बार्शीतल्या युवकाला फेसबुककडून 22 लाखांचं बक्षीस
आफताब शेख, एबीपी माझा
Updated at:
18 Jun 2021 09:28 PM (IST)

Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appआपण वापरत असलेले इन्स्टाग्राम किंवा फेसबुक किती सुरक्षित आहे हे आपल्याला माहिती आहे काय? आज इंटरनेट आपल्या सर्वांच्या जीवनात एक महत्त्वाचा भाग झाला आहे, परंतु हे धोकादायक देखील सिद्ध होऊ शकते. जगाच्या कानाकोपऱ्यात गुन्हेगार मनाचे हॅकर्स बसले आहेत जे तुमची वैयक्तिक माहिती रात्रंदिवस चोरी करण्याचा प्रयत्न करतात. ही बाब कोल्हापूर येथील तात्यासाहेब कोरे इंजिनिअरिंग कॉलेज मध्ये संगणक शास्त्राचे शिक्षण घेत असलेल्या बार्शीतील मयूर फरताडे यांनी फेसबुक आणि इन्स्टाग्रामला हे बग कळवून हॅकर्सच्या हातात येण्यापासून वाचवले. त्याच्या या संशोधनाची दखल घेत फेसबुक ने त्याला 30 हजार डॉलरचे बक्षीस जाहीर केले आहे. तसा मेल त्याला पाठवला आहे.