Yogi Adityanath : यूपीचे योगी... संन्यासी ते उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्रीपदाचा प्रवास Special Report
शिशुपाल कदम, एबीपी माझा | 03 Feb 2022 11:32 PM (IST)
देशातल्या पाच राज्यांमध्ये होणाऱ्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर 'कोण होणार मुख्यमंत्री?' या आमच्या खास कार्यक्रमात आपलं स्वागत... २०१७ साली उत्तर प्रदेशच्या राजकारणात प्रचंड उलथापालथ झाली. अखिलेश सरकार पडलं आणि विक्रमी बहुमतासह भाजप सत्तेत आला. उत्तर प्रदेशातल्या भाजपच्या या सर्वात मोठ्या विजयामागे एका व्यक्तीचं मोठं योगदान होतं, ती व्यक्ती म्हणजे... योगी आदित्यनाथ! हेच योगी आदित्यनाथ पुढे उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री बनले. पण योगी आदित्यनाथांचा मुख्यमंत्रीपदापर्यंतचा प्रवास फार रंजक आहे. मूळचे उत्तराखंडचे असलेले योगी संन्यासी कसे झाले? मग त्यांचा राजकारणात प्रवेश कसा झाला? आणि योगी उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्रीपदी कसे विराजमान झाले या सगळ्याचा आढावा घेणारा आमचा प्रतिनिधी शिशुपाल कदमचा हा खास रिपोर्ट...