Special Report : कोरोना परिस्थिती हाताळण्यात योगींना अपयश? यूपीत योगींचं स्थान डळमळीत झालंय?
प्रशांत कदम, एबीपी माझा, दिल्ली | 08 Jun 2021 07:46 PM (IST)

योगी आदित्यनाथ, भाजपसाठी हिंदुत्वाचा फायरब्रँड चेहरा! यूपीच्या बाहेर इतर राज्यांत होणाऱ्या निवडणुकांतही योगींच्या प्रचारसभांना त्यामुळेच अधिक मागणी असते. पण आता स्वत:च्याच राज्यात योगींचं स्थान काहीसं डळमळीत होताना दिसलं. 2022 च्या विधानसभा निवडणुका योगींच्या नेतृत्वातच लढायच्या की नाही याबाबत मंथन करण्याची वेळ आली होती. अखेर भाजप हायकमांडनं याबाबत निर्णय घेतलाय.