Cough Syrup Death Yavatmal : कफ सिरपमुळे मुलाचा मृत्यू? यवतमाळ हादरलं Special Report
abp majha web team | 13 Oct 2025 10:14 PM (IST)
यवतमाळच्या (Yavatmal) कळंब तालुक्यातील पिंपळखुटी गावात ६ वर्षीय शिवम गुरनुले या मुलाचा मृत्यू झाल्याने खळबळ उडाली आहे. सर्दी-खोकल्याचे औषध घेतल्यानंतर शिवमचा मृत्यू झाल्याचा आरोप त्याच्या कुटुंबीयांनी केला आहे. 'त्याचा आणि कफ सिरपचा काही संबंध नसेल असं मला खरी वाटतंय,' असे सांगत खाजगी डॉक्टरानी हा आरोप फेटाळून लावला आहे. डॉक्टरांच्या मते, मुलगा मतिमंद असल्याने त्याला भरवताना अन्न श्वासनलिकेत गेल्याने (Aspiration) त्याचा मृत्यू झाला असावा. या घटनेनंतर, अन्न आणि औषध प्रशासनाने (FDA) तातडीने कारवाई करत संबंधित मेडिकलमधून सहा औषधांचे नमुने तपासणीसाठी पाठवले आहेत आणि खबरदारी म्हणून राज्यात या औषधांचे वितरण थांबवण्याचे आदेश दिले आहेत. आता या प्रकरणातील सत्य पोस्टमॉर्टेम रिपोर्ट (Post-mortem Report) आल्यानंतरच समोर येईल.