Wresters Protest Special Report : लैंगिक शोषणाचे आरोप, बृजभूषण सिंहांची प्रतिक्रिया, आरोप फेटाळले
abp majha web team | 01 May 2023 11:56 PM (IST)

Wresters Protest Special Report : लैंगिक शोषणाचे आरोप, बृजभूषण सिंहांची प्रतिक्रिया, आरोप फेटाळले
राजधानी दिल्लीतल्या जंतरमंतरवर खेळाडूंचं आंदोलन आठ दिवसानंतरही कायम आहे. एकीकडे सुप्रीम कोर्टानं सांगितल्यावर बृजभूषण सिंह यांच्याविरोधात दिल्ली पोलिसांनी केस दाखल केली. पण यात राजकीय, प्रादेशिक वादांचीही किनार उभी करण्याचा प्रयत्न होतोय. गेल्या आठ दिवसांपासून दिल्लीतल्या जंतरमंतरवर कुस्तीपटूंचं आंदोलन सुरु आहे. आंदोलकांनी दिल्ली पोलिसांकडे लैंगिक छळाची तक्रार दाखल केली होती..पण पाच दिवस दिल्ली पोलिस त्यावर काही हालचाल करत नव्हते. अखेर सुप्रीम कोर्टानं फटकारल्यानंतर ही तक्रार दाखल करुन घेतली. आता जोपर्यंत बृजभूषण यांचा राजीनामा होत नाही तोपर्यंत माघार नाही असा आंदोलकांनी पवित्रा घेतलाय.