Women Reservation : महिला आरक्षण विधेयकावरून सत्ताधारी-विरोधक आमने-सामने Special Report

देशात लोकसभा मतदारसंघांची संख्या वाढवून त्यातून महिलांना ३३ टक्के आरक्षण देण्याची प्रक्रिया सुरू झालीये... केंद्र सरकारनं बोलावलेल्या विशेष अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा, काँग्रेस खासदार प्रियंका गांधी, समाजवादी पार्टीचे नेते अखिलेश यादव यांनी गाजवला... आज लोकसभेत काय घडलं, यावरचा स्पेशल रिपोर्ट...
देशाच्या राजकारणात मोठा बदल होऊ घातलाय अन् त्याची सुरूवात गुरुवारी लोकसभेतून झाली...
स्वातंत्र्यानंतर प्रथमच लोकसभा मतदारसंघांची संख्या ५४३वरून वाढवून...
८५० करतानाच महिलांना लोकसभेत ३३ टक्के आरक्षण देणारी विधेयकं मांडली गेलीयेत...
केंद्रीय विधी व न्यायमंत्री अर्जून राम मेघवाल यांनी तीन विधेयकं लोकसभेत सादर केली...
३३ टक्के महिलांना आरक्षण देणारं नारी शक्ती वंदन विधेयक...
मतदारसंघ फेररचनेसाठी आयोगाच्या स्थापनेसाठी विधेयक...
लोकसभेची क्षमता वाढवण्यासाठी १३१वी घटनादुरुस्ती विधेयक...
यापैकी महिला आरक्षणाच्या बाजुनं असलेल्या विरोधकांचा अन्य दोन विधेयकांना मात्र विरोध आहे...
या विधेयकांना विरोध करणाऱ्यांना देशाच्या महिला माफ करणार नाहीत, असा इशारावजा सल्ला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिला...
मतदारसंघ फेररचनेत दक्षिणेतल्या राज्यांवर अन्याय होणार नाही, अशी हमीदेखील पंतप्रधानांनी दिलीये...
'इंडिया' आघाडीचा भाग असलेली ठाकरेंची शिवसेना आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीनं मतदारसंघ फेररचनेला विरोध केलाय...
पाच पश्चिम बंगाल आणि तामिळनाडू विधानसभा निवडणुकांमुळेच हे नाटक सुरू असल्याचा आरोप अरविंद सावंत यांनी केला...