Suicide after Harassment : शेजाऱ्यांच्या त्रासाला कंटाळून दहा वर्षाच्या मुलासह महिलेची आत्महत्या
गणेश ठाकूर, एबीपी माझा | 24 Jun 2021 12:17 AM (IST)

मुंबई : मुंबईच्या साकीनाका येथे एक महिलेने शेजाऱ्याच्या त्रासाला कंटाळून दहा वर्षाच्या मुलासह इमारतीच्या बाराव्या मजल्यावरुन उडी मारून आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. रेश्मा ट्रेन्चील ( 44 वर्षे ) आणि त्यांचा मुलगा गरुड वय (10 वर्षे) असे मृत मायलेकांची नावे आहे. शेजाऱ्यांच्या त्रासाला कंटाळून हे पाऊल उचलले आहे. या घटनेने परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. पोलिसांनी या प्रकरणी एकाला अटक केली असून इतर दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.