Mumbai Local : 12 लाख मुंबईकरांचे दोन्ही डोस पूर्ण, लस घेतलेल्यांसाठी सरकार रेल्वेचं दार उघडणार?
अक्षय भाटकर, एबीपी माझा | 09 Jul 2021 11:38 PM (IST)
अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांना क्यू आर कोड सिस्टीमच्या मार्फत लोकलने प्रवास करू दिला जाणार आहे. जर सरकारला लोकलमधील गर्दी कमीच करायची असेल तर हीच सिस्टीम सर्वांना लागू करता येऊ शकते. त्यामुळे अनावश्यक प्रवासी घरीच राहतील. किंवा आधुनिक तंत्रज्ञान वापरून देखील स्टेशनमधील एंट्री एक्झिट रोखता येईल पण त्यासाठी सरकारच्या मनात ते असायला हवं.