पाटलांच्या दिल्ली दौऱ्यात युतीबाबत चर्चा होणार? सेनेनं हात सोडल्यानंतर भाजप मनसेचा हात धरणार?
गणेश ठाकूर, एबीपी माझा | 06 Aug 2021 11:54 PM (IST)
मुंबई : भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी आज कृष्णकुंजवर राज ठाकरे यांची भेट घेतली. या भेटीनंतर चंद्रकांत पाटील यांनी माध्यमांशी संवाद साधला. ते म्हणाले की, आमच्या भेटीत युतीबाबत चर्चा झाली नाही. मुंबई महापालिकेसाठी भाजप-मनसे युतीबाबत आज चर्चा झाली नाही. आजची भेट राजकीय नव्हती. प्रत्येक गोष्टीसाठी योग्य वेळ यावी लागते. युतीसाठी परप्रांतियांबाबतची भूमिका बदलल्याशिवाय चर्चा नाही. परप्रांतियांबाबतच्या भूमिकेवर राज ठाकरे यांच्याशी चर्चा केली. त्या भूमिकेबद्दल राज ठाकरे यांचं मन वळवण्याचा प्रयत्न केला.