Thackeray VS Shinde Special Report : शिंदेंचा व्हिप ठाकरे गटाचे 15 आमदार मानणार?
abp majha web team | 18 Feb 2023 08:36 PM (IST)

शिवसेना आणि धनुष्यबाण या लढ्याचा निर्णय अखेर निवडणूक आयोगाने दिलाय. मात्र पक्षाच्या आणि विधीमंडळ कामकाजाच्या संदर्भात अनेक गोष्टींवरती स्पष्टता नाही. त्यामुळे विधिमंडळात शिंदे गटाचा व्हिप लागू होणार की नाही. त्याच सोबत पार्टी फंडाचे अधिकार नेमके कोणाकडे असतील ? हे सगळे प्रश्न अनुत्तरीत आहेत. आणि याच प्रश्नांमुळे दोन गटात पुन्हा वादाची ठिणगी पडू शकते.