Special Report : HRCT मुळे वाचले अनेकांचे प्राण, कोरोना रिपोर्ट निगेटिव्ह तरीही फुफ्फुसांना संसर्ग
नाजिम मुल्ला, एबीपी माझा, पिंपरी चिंचवड
Updated at:
19 Apr 2021 11:16 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appदुसऱ्या लाटेत कोरोनाचे गंभीर रुग्ण आढळत असल्याचं अनेकदा समोर आलंय. लक्षणं दिसूनही ती अंगावर काढल्याने अशी परिस्थिती उद्भवत आहे. ही बाब अनेकांच्या जीवावर देखील बेतलेली आहे. आता तुम्हाला अशी वेळ येऊन द्यायची नसेल तर वेळीच एचआरसिटीचा पर्याय अवलंबणे गरजेचे आहे. तेव्हाच पुढचा धोका टळू शकतोय. कोरोनाची लक्षणं जाणवत असताना अनेकजण भितीपोटी चाचणी करणं टाळतात. त्यातून ही चाचणी केली आणि लागण झाल्याचं समजलं तर अनेकांकडून घरीच उपचार घेण्याचं ठरवलं जातं. हीच बाब 45 वर्षांवरील रुग्णांच्या जीवावर बेतणारी ठरते. आता हा धोका उद्भवू द्यायचा नसेल तर एचआरसिटीचा पर्याय अवलंबणे अधिक गरजेचं आहे.